भव्य राम मंदिरानंतरही भाजपने अयोध्या का गमावली? वाचा ग्राऊंड रिअॅलिटी
लखनौ : मंदिर वही बनाएंगे, ‘जो राम को लाये है, हम उनको लाएंगे’ अशा घोषणा लोकसभा निवडणुकांच्या काळात देशातील कानाकोपऱ्यातून ऐकायला मिळत होत्या. एवढेच काय तर देशभरात पार पडलेल्या जाहीर प्रचारसभांमध्येही भाजपने हा मुद्दा कळीचा केला होता. मात्र, अयोध्येत (Ayodhya Ram Mandir) रामलल्लाच्या भव्य मंदीर उभारल्यानंतरही अयोध्येत भाजपला पराभावचा सामना करावा लागला आहे. अवघ्या चार महिन्यांतच अखेर असे काय झाले की, करोडो देशवासियांना भव्य राम मंदिर आणि अयोध्येत पुन्हा रामराज्य निर्माण करणाऱ्या भाजपला अयोध्येतच पराभवाला का सामोरे जावे लागले याचीच ग्राऊंड रिअॅलिटी आपण जाणून घेऊया. (Why Narendra Modi & BJP Loss In Ayodhya Seat)
रामलला हम आएंगे, मंदिर वहीं बनाएंगे: अयोध्येतील सुप्रसिद्ध घोषणांचे शिल्पकार कोण होते?
4 जून रोजी हाती आलेल्या निकालानंतर भाजपला एकहाती सत्ता स्थापन करणेही शक्य नसल्याचे स्पष्ट झाले आहे. मोदी 3.0 सत्तेत येण्यापूर्वी अनेक जागांवर भाजपच्या पराभवाबाबत मंथन सुरू झाले आहे. यापैकी सर्वात जास्त चर्चा सुरू आहे ती फैजाबाद लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या अयोध्येची.
पराभवाचा ग्राऊंड रिपोर्ट नेमका काय?
अयोध्या शहर फैजाबाद लोकसभा मतदारसंघांतर्गत येते. अयोध्या जिथं राममंदिराच्या उभारणीमुळे भाजप यावेळी मोठ्या मताधिक्याने जिंकेल अशी आशा होती. पण येथेच भाजपला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले. कैसरगंज आणि गोंडा जागा वगळता भाजपने एक-दोन नव्हे तर अयोध्येच्या आसपास 15 हून अधिक जागा गमावल्या आहेत. या जागेवरून समाजवादी पक्षाचे अवधेश प्रसाद यांनी भाजपचे तत्कालीन खासदार लल्लू सिंह यांचा पराभव करत दिल्लीचं तिकीट फिक्स केलं आहे.
1992 चे वर्ष, रेल्वे स्टेशन अन् कारसेवकांची गर्दी : फडणवीस यांचा अयोध्या आंदोलनातील फोटो सापडला
अयोध्येती पराभव लल्लू सिंह यांच्यामुळेच
फैजाबाद लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या पराभवामागे समाजवादी रणनीती हेही प्रमुख कारण मानले जात आहे. या निकालात लल्लू सिंह यांच्या विरोधातील अँटी इन्कम्बन्सीही मोठी कारणीभूत ठरली आहे. अयोध्येतील पराभवानंतर येथील स्थानिक नागरिकांनी सांगितले की, अयोध्येत खूप विकास झाला आहे, मात्र भाजप उमेदवार लल्लू सिंह यांच्यामुळेच भाजपला पराभवाला सामोरे जावे लागले आहे. लल्लू सिंह तळागाळातील मतदारांशी संपर्क साधण्यात कमी पडल्याचे येथील नागरिक सांगतात. येथे विकास झाला पण केवळ विकास हा मुद्दा जिंकण्यासाठी महत्त्वाचा ठरत नाही. येथे अनेक गरिबांना आर्थिक मदत आणि आरोग्य सुविधाही मिळालेली नाही ही खरी परिस्थिती आहे.
मंदिरासाठी जमीन अधिग्रहणाचा मुद्दा ठरला चर्चेचा
अयोध्येत ज्यावेळी भव्य राम मंदिराचे बांधकाम सुरू करण्यात आले त्यावेळी येथे मोठ्या प्रमाणात जमिनीचे भूसंपादन करण्यात आले होते. यात अनेकांची घरे, दुकाने तोडण्यात आली. पण त्याबदल्यात या नागरिकांना राज्य सरकारकडून कोणतीही नुकसान भरपाई अद्यापही मिळाली नसल्याचे सांगितले जात आहे. अयोध्येतील राम मंदिरापर्यंत जाण्यासाठी सर्वात लांब रामपथ बांधण्यात आला. हा चौदा किलोमीटर लांबीचा मार्ग सहादत गंज ते नयाघाट असा जातो. या मार्गात 30 मंदिरे, 9 मशिदी, सहा थडगे आणि हजारो घरे आणि दुकाने हटविण्यात आली. हा रस्ता बांधताना शासनानेह काही दुकानदारांना नुकसान भरपाई दिली आहे मात्र, अनेकांच्या दुकानांची व घरांची कागदपत्रे नसल्याने त्यांना नुकसान भरपाई मिळालेली नाही. त्यामुळे येथील पराभवामागे जमिन अधिग्रहण आणि त्याबदल्यान देण्यात न आलेली नुकसान भरपाई हे एक प्रमुख कारण मानले जात आहे.
आयाराम, गयारामलाही नितीश कुमारांनी मागं टाकलं; शरद पवारांची खोचक टीका
राम मंदिराच्या नादात ग्रामीण भागाकडे दुर्लक्ष
जमीन अधिग्रहण मुद्द्याशिवाय अयोध्येतील नागिकांमध्ये दुसरी नाराजी होती ती म्हणजे भाजपने अयोध्येच्या विकासावर सर्वाधिक भर दिला. यासाठी सोशल मीडियापासून ते निवडणुकीच्या प्रचारापर्यंत सगळीकडे याबाबत भाष्य केले. पण दुसरीकडे अयोध्येच्या ग्रामीण भागाकडे फारसे लक्ष दिले नाही. एकीकडे जरी अयोध्येचा विकास झाला असला तरी, मात्र दुसरीकडे येथील ग्रामीण भागाचे चित्र पूर्णपणे वेगळे आहे. ही नाराजी मतदारांनी भाजपचा पराभव करून दाखवून दिल्याचे आता बोलले जात आहे.
जातीय समीकरण आणि मुस्लिम घटक
फैजाबाद लोकसभा मतदारसंघात दर्यााबाद, बिकापूर, रुदौली, अयोध्या आणि मिल्कीपूर या पाच विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. यापैकी मिल्कीपूर आणि बिकापूर या दोन विधानसभा मतदारसंघात अखिलेश यांनी सभा घेतल्या. येथे त्यांनी भूसंपादन, नुकसान भरपाईचा मुद्दा, तरुणांना नोकऱ्या देणे असे मुद्दे जनतेपर्यंत नेले. पण अखिलेश यांनी खरी खेळी खेळली ती फैजाबादच्या जागेवर.
फैजाबादच्या जागेवर अखिलेश यादव यांनी नवी खेळी खेळली आणि ती यशस्वीदेखील झाली. फैजाबादची जागा सर्वसाधारण असतानाही समाजवादी पक्षाने अयोध्येतील सर्वात जास्त दलित लोकसंख्या असलेल्या पासी समाजातील सर्वात मोठा चेहरा असलेल्या अवधेश प्रसाद यांना उमेदवारी दिली, येथून निवडणुकीला खरी रंगत आली आणि ‘ना मथुरा ना काशी अयोध्येमध्ये फक्त अवधेश पासी’. अशी लाट सुरू झाली आणि ती अवधेस प्रसाद यांच्या विजयामुळे यशस्वीदेखील झाली.
400 पार अन् संविधान बद्दलचे विधान भोवले
भाजपचे खासदार आणि फैजाबादचे उमेदवार लल्लू सिंह यांनी संविधान बदलण्यासाठी भाजपला 400 जागांची गरज असल्याचे विधान केले होते. त्यांचे हा विधान फैजाबादमधील दलित मतदारांना आवडले नाही आणि त्याचे परिणाम भाजपला भोगावे लागले. लल्लू सिंह यांच्या वक्तव्यामुळे होणारे नुकसान थांबवण्याचा भाजपने सर्वतोपरी प्रयत्न केला पण तो अपयशी ठरल्याचेही निकालाने स्पष्ट झाले आहे.