Ayodhya Ram Mandir : अयोध्या राम मंदिराचे पुजारी मोहित पांडे कोण आहेत?

Ayodhya Ram Mandir : अयोध्या राम मंदिराचे पुजारी मोहित पांडे कोण आहेत?

Ayodhya Ram Mandir : अयोध्येतील (Ayodhya Ram Mandir) भव्य राम मंदिराच्या गर्भगृहाची प्राण-प्रतिष्ठा आणि अभिषेकासाठी 22 जानेवारी 2024 ही तारीख निश्चित करण्यात आली आहे. या मंदिराचे उद्घाटन 24 जानेवारी 2024 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अनेक मान्यवर सहभागी होणार आहेत. पंतप्रधानांच्या हस्ते रामलला यांच्या प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे. सध्या मंदिराचे काम आणि तयारी जोरात सुरू आहे. राम मंदिरात होणाऱ्या पूजेसाठी पुजाऱ्याचीही निवड करण्यात आली आहे.

राम मंदिरातील रामललाच्या पूजेसाठी पुजारी म्हणून मोहित पांडे (Mohit Pandey) यांचे नाव निश्चित झाले आहे. मोहित पांडे हे उत्तर प्रदेशातील गाझियाबादचे आहेत. रामललाच्या पूजेसाठी नेमलेल्या पुजार्‍यांसाठी काही निकष ठरवण्यात आले होते. त्यात रामनंदीय परंपरेचा अभ्यासक असणे आवश्यक आहे. याशिवाय राम मंदिरात पूजा करणार्‍या पंडिताला वेद, शास्त्र आणि संस्कृत इत्यादी विषयातही निपुण असणे आवश्यक आहे. मोहित पांडे यांनी हे सर्व पॅरामीटर्स पास केले आहेत. राम मंदिरात पुजारी म्हणून नेमलेल्या मोहित पांडे यांच्याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.

मोहित पांडे यांची निवड कशी झाली?
अयोध्येत बांधल्या जाणाऱ्या भव्य राम मंदिरासाठी पुजाऱ्यांच्या निवडीसाठी औपचारिक अर्ज मागवण्यात आले होते. यामध्ये 3 हजार उमेदवारांनी अर्ज केले होते. निवड प्रक्रियेत पुरोहितांसाठी निकष लावण्यात आले होते, ज्यातून सर्वांना जावे लागले. या प्रक्रियेत, 200 अर्जदार पुजारी मुलाखतीसाठी पोहोचले होते. यामध्ये 50 पुरोहित म्हणून निवडले गेले आहेत. या 50 पुरोहितांमध्ये मोहित पांडे यांचेही नाव आहे. सध्या मोहित पांडे चर्चेत आहेत.

MLA Disqualification प्रकरणी मोठी अपडेट; वेळापत्रक पुन्हा बदलले, ‘या’ दिवशी होणार सुनावणी

मोहित पांडे कोण आहेत?
– रामललाचा सेवक म्हणून निवडलेला मोहित पांडे सध्या तिरुपती येथील तिरुमाला तिरुपती देवस्थानम (TTD) द्वारे संचालित श्री वेंकटेश्वर वैदिक विद्यापीठ (SVVU) येथे एमए (आचार्य) अभ्यासक्रम करत आहे. ते उत्तर प्रदेशातील सीतापूरचे रहिवासी आहेत.

– प्रथम श्रेणी ऑनर्ससह पदवी पूर्ण केल्यानंतर त्यांनी एमए (आचार्य) अभ्यासक्रमात प्रवेश घेतला. सध्या मोहित पांडे हे सामवेद विभागात प्रथम वर्षाला शिकत आहेत.

– मोहित पांडे यांची अयोध्या रामलला मंदिरासाठी सामवेद शाखेत ‘आचार्य’ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. नियुक्तीपूर्वी मोहित पांडे यांना सहा महिन्यांचा प्रशिक्षण कालावधी आहे.

अशाच प्रकारे उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र या राज्यांमधून राम मंदिरासाठी इतर पुजारी निवडण्यात आले आहेत. हे सर्व पुजारी रामानंदीय परंपरेतील असून त्यांना वेद, शास्त्र आणि संस्कृतमध्ये पारंगत आहे.

सूर्यकुमारने दुसऱ्या T20 मध्ये रचला इतिहास, असे करणारा चौथा फलंदाज

मोहित पांडे यांना किती पगार मिळणार?
श्री राम मंदिर तीर्थ क्षेत्र ट्रस्टने नुकतीच पुजाऱ्यांच्या पगारात वाढ केली होती. या ट्रस्टने मे महिन्यात पहिली वेतनवाढ देताना मुख्य पुजाऱ्यांना दरमहा 25 हजार आणि सहायक पुजाऱ्यांना 20 हजार रुपये मानधन देण्याचा निर्णय घेतला होता. ऑक्टोबर महिन्यात मुख्य पुजाऱ्यांचा पगार पुन्हा 25 हजारांवरून 32,900 रुपये आणि सहाय्यक पुजाऱ्यांचा पगार 31 हजार रुपये करण्यात आला.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube