सूर्यकुमारने दुसऱ्या T20 मध्ये रचला इतिहास, असे करणारा चौथा फलंदाज

सूर्यकुमारने दुसऱ्या T20 मध्ये रचला इतिहास, असे करणारा चौथा फलंदाज

IND vs SA : सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर (IND vs SA) T20 मालिका खेळत आहे. पहिला सामना पावसामुळे रद्द झाल्यानंतर दुसरा टी-20 सामना सेंट जॉर्ज पार्क येथे खेळवला जात आहे. प्रथम फलंदाजी करताना कर्णधार सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) T20 मध्ये सर्वात जलद 2000 धावा करणारा दुसरा खेळाडू ठरला. याशिवाय T20 फॉरमॅटमध्ये सर्वाधिक धावा करणारा तो चौथा भारतीय फलंदाज ठरला.

सूर्यापूर्वी विराट कोहलीने टी-20 मध्ये भारतासाठी सर्वात जलद 2000 धावांचा टप्पा गाठला होता. तर T20 मध्ये सर्वात जलद 2000 धावा करणाऱ्यांच्या यादीत पाकिस्तानचा माजी कर्णधार बाबर आझम पहिल्या क्रमांकावर आहे. T20 मध्ये 52 डावात 2000 धावांचा टप्पा गाठणारा बाबर सर्वात जलद होता. त्यानंतर या यादीत पाकिस्तानचा यष्टिरक्षक फलंदाज मोहम्मद रिझवान देखील संयुक्त पहिल्या स्थानावर आहे. त्याने T20 फॉर्मेटमध्ये 2000 धावा 52 डावात पूर्ण केल्या.

त्यानंतर भारताचा माजी कर्णधार विराट कोहली आणि सूर्यकुमार यादव संयुक्तपणे दुसऱ्या आणि केएल राहुल तिसऱ्या स्थानावर आहे. सूर्याने केएल राहुलचा मागे टाकले आहे. सूर्याने 56 टी-20 डावांमध्ये 2000 धावा पूर्ण केल्या, तर केएल राहुलने 58 डावांमध्ये हा आकडा पार केला. तर विराट कोहलीने T20 मध्ये 2000 धावा करण्यासाठी 56 डाव खेळले आहे.

MLA Disqualification प्रकरणी मोठी अपडेट; वेळापत्रक पुन्हा बदलले, ‘या’ दिवशी होणार सुनावणी

T20 मध्ये सर्वात जलद 2000 धावा
52 डाव – बाबर आझम
52 डाव – मोहम्मद रिझवान
56 डाव – विराट कोहली
56 डाव – सूर्यकुमार यादव*
58 डाव – केएल राहुल

भारतासाठी सर्वाधिक धावा करणारे फलंदाज
T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम विराट कोहलीच्या नावावर आहे. कोहलीने आतापर्यंत 107 डावांमध्ये 4008 धावा केल्या आहेत. याशिवाय रोहित शर्मा भारतासाठी T20 मध्ये सर्वाधिक धावा करणारा दुसरा, केएल राहुल तिसरा आणि सूर्यकुमार यादव चौथा फलंदाज ठरला आहे.

मंत्रीपदासाठी आपल्या नेत्यांपुढं डबक्यातली बेडकं ओरडतात, रोहित पवारांना हल्लाबोल

4008 धावा – विराट कोहली (107 डाव)
3853 धावा – रोहित शर्मा (140 डाव)
2256 धावा – केएल राहुल (68 डाव)
2000* धावा – सूर्यकुमार यादव (56 डाव).

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube