Ram Mandir प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी शिंदे सरकारचा मोठा निर्णय; राज्य सरकारकडूनही सुट्टी जाहीर!
Ram Mandir : 22 तारखेला होणाऱ्या अयोध्येतील श्रीरामांच्या (Ram Mandir) प्राण प्रतिष्ठासोहळ्यासाठी संपूर्ण देश सज्ज झाला आहे. सर्वत्र उत्साहाचं वातावरण आहे. त्यात केंद्र सरकारने (Central Govt) 22 जानेवारीला सरकारी कर्मचाऱ्यांना अर्ध्या दिवसाची सुट्टी मिळणार असल्याची घोषणा केली होती. त्यानंतर राज्यातील शिंदे सरकारने देखील मोठा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता राज्यातही 22 जानेवारीला सुट्टी असणार आहे.
22 जानेवारीला राज्य सरकारतर्फे सुट्टी जाहीर करण्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हिरवा कंदील दाखवला होता. त्यानंतर संध्याकाळी याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आली. 22 जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील जनतेला दिवाळी साजरी करण्याचं आवाहन केलं आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारकडून सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
Public holiday declared on 22nd January in Maharashtra in view of Ayodhya Ram Temple pranpratishtha pic.twitter.com/Iv9ZxNjJHX
— ANI (@ANI) January 19, 2024
श्रीराम भक्तांच्या भावना लक्षात घेऊन केंद्र आणि राज्यसरकारकडून हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. सरकारने आपल्या आदेशात म्हटले आहे की, भारत सरकारच्या गृहमंत्रालयाच्या अधिसूचने अन्वये महाराष्ट्र शासनाकडे सोपवण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून महाराष्ट्र शासन या अधिसूचनेद्वारे महाराष्ट्र राज्य 2024 या सालातील 22 जानेवारी 2024 या दिवशी आयोध्यातील रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्या दिनी सार्वजनिक सुट्टी जाहीर करत आहे.
गोड हास्य, कपाळी टिळा अन् हातात धनुष्य, असा दिसतोय रामललाचा पहिला फोटो
दरम्यान या अगोदर केंद्र सरकारच्या आदेशामध्ये सांगण्यात आलं होतं की, योध्येतील रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा 22 जानेवारी 2024 रोजी संपूर्ण भारतात साजरी केली जाईल. सरकारी कर्मचार्यांना उत्सवात सहभागी होण्यासाठी सक्षम करण्यासाठी, भारतभरातील सर्व केंद्र सरकारची कार्यालये, केंद्रीय संस्था आणि केंद्रीय औद्योगिक आस्थापने 22 जानेवारी 2024 रोजी दुपारी 2:30 वाजेपर्यंत अर्धा दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.