मोठी बातमी : MPSC च्या परीक्षा लांबणीवर; तयारी करणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांचा हिरमोड

मोठी बातमी : MPSC च्या परीक्षा लांबणीवर; तयारी करणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांचा हिरमोड

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोग अर्थात एमपीएससीकडून (MPSC) परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. यात 28 एप्रिल रोजी होणारी ‘संयुक्त पूर्व परीक्षा 2024’, 19 मे रोजी होणाऱ्या ‘समाज कल्याण अधिकारी गट ब’, ‘इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी गट ब’ या परीक्षांचा समावेश आहे. आयोगाकडून परिपत्रक काढून याबाबत माहिती देण्यात आली आहे. सुधारित तारखा अद्याप जाहीर करण्यात आलेल्या नाहीत. (Maharashtra Public Service Commission Joint Prelims Exam 2024 and other exams have been postponed.)

महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 तसेच जा.क्र. 034/2023 समाज कल्याण अधिकारी, गट-ब आणि जा.क्र. 133/2023 इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी, गट ब संवर्गाकरीताची सामाईक चाळणी परीक्षा पुढे ढकलण्यात येत आहे, सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासवर्गांकरिता अधिनियम 2024 मधील आरक्षणाच्या तरतुदी विचारात घेता शासनाकडून सुधारित आरक्षण निश्चिती प्राप्त झाल्यानंतर परीक्षांबाबत घोषणा केली जाईल, असे आयोगाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज