भारतीय वंशाच्या डॉक्टरला रिपब्लिकन पक्षात मोठा मान, डोनाल्ड ट्रम्पसाठी बजावणार महत्वाची भूमिका…

भारतीय वंशाच्या डॉक्टरला रिपब्लिकन पक्षात मोठा मान, डोनाल्ड ट्रम्पसाठी बजावणार महत्वाची भूमिका…

Dr. Sampat Shivangi : अमेरिकेत (America) येत्या काही महिन्यात राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुका होत आहेत. डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) पुन्हा एकदा रिपब्लिकन पक्षाकडून अध्यक्षपदासाठी निवडणूक लढवणार आहेत. दरम्यान, डॉ. संपत शिवांगी (Dr. Sampat Shivangi) यांची पुन्हा एकदा ट्रम्प यांना उमेदवारी देण्यासाठी मिलवॉकी येथे होणाऱ्या अधिवेशनासाठी अधिकृत प्रतिनिधी म्हणून निवड करण्यात आली आहे.

The Buckingham Murders Poster: करीना कपूरच्या ‘द बकिंगहॅम मर्डर्स’चे रहस्यमय पोस्टर रिलीज 

5 नोव्हेंबरला अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुका होत आहेत. डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा रिपब्लिकन पक्षाकडून अध्यक्षपदासाठी निवडणूक लढवणार आहेत. त्यामुळे 13 जुलै ते 19 जुलै दरम्यान मिलवॉकी शहरात रिपब्लिकन राष्ट्रीय अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेत डोनाल्ड ट्रम्प यांना अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी दिली जाणार आहे. डॉ. संपत शिवांगी यांची ट्रम्प यांना उमेदवारी देण्यासाठी मिलवॉकी येथे होणाऱ्या अधिवेशनासाठी अधिकृत प्रतिनिधी म्हणून निवड करण्यात आली आहे. सलग सहाव्यांदा डॉ.संपत शिवांगी यांची प्रतिनिधी म्हणून निवड झाली आहे. ते डोनाल्ड ट्रम्प यांना पक्षाचे अध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून औपचारिकपणे नामनिर्देशित करतील.

हिंदुस्तान कॉपर लिमिडेटमध्ये ‘या’ पदांसाठी भरती, महिन्याला मिळणार एक लाखांहून अधिक पगार 

कोण आहेत डॉ. संपत शिवांगी?
डॉ. संपत शिवांगी हे रिपब्लिकन पक्षाचे सदस्य आहेत आणि रिपब्लिकन इंडियन कौन्सिल आणि रिपब्लिकन इंडियन नॅशनल कौन्सिलचे संस्थापक देखील आहेत. सलग सहाव्यांदा त्यांच्याकडे प्रतिनिधी म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. डॉ. संपत शिवांगी हे भारतीय अमेरिकन फोरम फॉर पॉलिटिकल एज्युकेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, जे सर्वात जुन्या भारतीय अमेरिकन संघटनांपैकी एक आहे.

अमेरिकन सीनेटर जॉन ओसाफ यांचा रामास्वामींना पाठिंबा
त्याच वेळी, जॉर्जिया स्टेट सिनेटसाठी लढणारे पहिले जेन-जेड भारतीय वंशाचे उमेदवार अश्विन रामास्वामी यांना यूएस सिनेटर जॉन ओसाफ यांनी पाठिंबा दिला आहे. 24 वर्षीय रामास्वामी जॉर्जियाच्या जिल्हा 48 मध्ये स्टेट सिनेटसाठी डेमोक्रॅटिक पक्षाकडून निवडणूक लढवत आहेत. विद्यमान स्टेट सिनेटर शॉन स्टिल यांच्या विरोधात ओसाफ यांनी दिलेला पाठिंबा मोठं प्रोत्साहन मानले जात आहे. रामास्वामी विजयी झाल्यास ते जॉर्जियाच्या इतिहासातील सर्वात तरुण प्रतिनिधी असतील.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज