T20 world cup 2024: अमेरिका आणि दक्षिण आफ्रिका; आजपासून रंगणार ‘सुपर-8’चा थरार

T20 world cup 2024: अमेरिका आणि दक्षिण आफ्रिका; आजपासून रंगणार ‘सुपर-8’चा थरार

USA VS South Africa  : पाकिस्तानला पराभवाचा धक्का दिल्यानंतर टी-२० (T20) विश्‍वकरंडकातील साखळी फेरीच्या लढतीत आता पहिल्यांदाच सहभागी होत असलेल्या अमेरिकन संघाच्या रडारवर दक्षिण आफ्रिकन संघ असणार आहे. (T20 world cup) अमेरिकन-दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये आज ‘सुपर-आठ’ गट दोन फेरीची लढत रंगणार आहे. एडन मार्करम, क्विंटॉन डी कॉक या दक्षिण आफ्रिकन फलंदाजांचा लढतीत कस लागणार आहे. (USA VS South) तर, अमेरिकन संघाला कर्णधार मोनांक पटेलच्या तंदुरुस्तीबाबत चिंता आहे.

सर्व लढती वेस्ट इंडीजमध्ये पुणे अपघाताची पुनरावृत्ती! खासदाराच्या मुलीने फुटपाथवरच्या लोकांना चिरडलं; एकाचा मृत्यू, जामीनही मिळाला

दक्षिण आफ्रिकन संघाचा साखळी फेरीमध्ये ड गटामध्ये समावेश होता. या गटातील चारही लढतींमध्ये दक्षिण आफ्रिकेने विजय संपादन करत आठ गुणांसह पहिलं स्थान पटकावलय. मात्र, यापैकी एकाही लढतीत त्यांना 120च्या वर धावा करता आलेल्या नाहीत. यापैकी तीन लढती अमेरिकेत होत्या. तर, एक लढत वेस्ट इंडीजमध्ये पार पडली. अमेरिकेतील लढतींमध्ये धावा करताना फलंदाजांची दमछाक उडाली झालं असलं तरी दक्षिण आफ्रिकन फलंदाजांचा अमेरिकन संघाविरुद्धच्या लढतीमध्ये कस लागणार आहे. त्याचबरोबर यापुढील सर्व लढती वेस्ट इंडीजमध्ये होणार आहेत. ही फलंदाजांसाठी दिलासा देणारी बाब मानली जात असेल.

नऊ फलंदाज बाद

ट्रिस्टन स्टब्स (७३ धावा), डेव्हिड मिलर (१०१ धावा), हेनरिक क्लासेन (७२ धावा) या तीनही फलंदाजांनी निर्णायक क्षणी चमकदार खेळी केली. मात्र, एडन मार्करम, क्विंटॉन डी कॉक व रिझा हेंड्रिक्स यांच्याकडून दबावाखाली खेळ उंचावण्याची अपेक्षा आहे. दक्षिण आफ्रिकन गोलंदाजांनी या स्पर्धेमध्ये कात टाकली आहे. कागिसो रबाडा, ओटनिल बार्टमॅन, मार्को यान्सेन व केशव महाराज यांनी ठसा उमटवला आहे. ॲनरिक नॉर्किया याच्याकडून आयपीएलमध्ये सुमार कामगिरी झाली, पण या स्पर्धेत त्याने झोकात पुनरागमन केलं. त्याने नऊ फलंदाज बाद केलं असून बार्टमन, महाराज यांनी प्रत्येकी पाच फलंदाजांना पॅव्हेलियनमध्ये पाठवलं आहे.

अमेरिका आता वेस्ट इंडीजमध्ये खेळणार दलाई लामांना भेटण्यासाठी नॅन्सी पेलोसी भारत दौऱ्यावर; 2017 च्या भेटीनंतर चीनने दिला होता इशारा

अमेरिकन संघाने साखळी फेरीच्या चारही लढती स्वत:च्या घरामध्ये अर्थातच अमेरिकेमध्ये खेळल्या आहेत. तेथील वातावरण व खेळपट्टी यांच्याशी योग्य सांगड घालत त्यांनी पुढल्या फेरीत वाटचाल केली. आता ‘सुपर-आठ’ फेरीमधील सर्व लढती त्यांना वेस्ट इंडीजमध्ये खेळावयाच्या आहेत. तेथील खेळपट्ट्यांवर ते प्रथमच खेळणार आहेत. यामुळे त्यांच्यासाठीही हे नवे आव्हान असणार आहे. या संघात आठ भारतीय वंशाचे, दोन पाकिस्तानी वंशाचे खेळाडू असून एक न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका व नेदरलँड्‌स येथील खेळाडू आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube