दलाई लामांना भेटण्यासाठी नॅन्सी पेलोसी भारत दौऱ्यावर; 2017 च्या भेटीनंतर चीनने दिला होता ‘हा’ इशारा

दलाई लामांना भेटण्यासाठी नॅन्सी पेलोसी भारत दौऱ्यावर; 2017 च्या भेटीनंतर चीनने दिला होता ‘हा’ इशारा

US Nancy Pelosi India Visit : अमेरिकेच्या माजी सभागृह सभापती नॅन्सी पेलोसी या दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आल्या आहेत. त्या तिबेटचे धर्मगुरू दलाई लामा यांची धर्मशाला येथे भेट घेणार आहेत. (Dalai Lama) पेलोसी यांच हिमाचल प्रदेशातील कांगडा विमानतळावर स्वागत करण्यात आलं. (US Nancy Pelosi ) त्यांच्यासोबत 6 अमेरिकन खासदारांचं शिष्टमंडळ उपस्थित आहे.

चीनचा दावाही फेटाळून लावण्याची शक्यता

पेलोसी यांनी तिबेटच्या स्वातंत्र्याला दीर्घकाळ पाठिंबा दिला आहे. त्या नॅन्सी यापूर्वी मे 2017 मध्ये दलाई लामांना भेटण्यासाठी भारतात आल्या होत्या. तेव्हा चीनने अमेरिकेला तिबेट प्रकरणात हस्तक्षेप करण्याबाबत इशारा दिला होता. दरम्यान, अमेरिकेत 12 जून रोजी तिबेटशी संबंधित विधेयक मंजूर करण्यात आलं. चीनने तिबेटबाबत जगभरात पसरवलेल्या खोट्या गोष्टींना अमेरिका उत्तर देईल, असे सांगण्यात आलं आहे. यावेळी अमेरिकन अधिकारी तिबेट हा आपला हिस्सा असल्याचा चीनचा दावाही फेटाळून लावतील अशी शक्यता वर्तवली जातीय.

तैवानला चारही बाजूंनी घेरल कोणी दम देईल पण तुम्ही विधानसभेलाही योग्य बटन दाबा; पवारांचा अजितदादांना टोला

हे विधेयक मंजूर झाल्यानंतर अमेरिकन खासदारांची ही भेट अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. खरं तर तिबेटला पाठिंबा देण्यासाठी चीन नेहमीच अमेरिकेला विरोध करत आला आहे. अशा परिस्थितीत नॅन्सी पेलोसी यांच्या या भेटीमुळे वाद आणखी वाढू शकतो. पेलोसी त्याच अमेरिकन नेत्या आहेत ज्यांच्या 2022 मध्ये तैवान भेटीला चीनने इशारा दिला होता. तेव्हा नॅन्सींच्या विमानाला यूएस नेव्ही आणि एअर फोर्सच्या 24 प्रगत लढाऊ विमानांनी एस्कॉर्ट केलं. या काळात चीनने तैवानला चारही बाजूंनी घेरून युद्ध सराव केला होता.

अमेरिकेत दलाई लामांचं महत्व वाढलं

2008 च्या नॅन्सी पेलोसी यांनी धर्मशाला येथे भेट दिली होती. त्यावेळी त्या म्हणाल्या होत्या की, अमेरिका तिबेटमधील मानवी हक्कांच संरक्षण करण्यासाठी आपलं काम सुरू ठेवेलं. तसंच, त्यांनी 2019 मध्ये संसदेत ‘द तिबेट पॉलिसी ऍक्ट’ पास करण्यास मदत केली. या कायद्याद्वारे अमेरिका तिबेटची ओळख वाचवण्यासाठी आवाज उठवत आहे. पेलोसी यांच्यामुळेच अमेरिकेत दलाई लामांचं महत्व वाढल्याचंही बोललं जात..

अखेर 1951 मध्ये करारावर सही विधानसभा निवडणुकीसाठी देवेंद्र फडणवीसांवरच ठाम विश्वास; दिल्लीत झाला मोठा निर्णय

चीन आणि तिबेटमधील वाद वर्षानुवर्षे जुना आहे. चीनच्या म्हणण्याप्रमाणे की तिबेट तेराव्या शतकात चीनचा भाग होता, त्यामुळे तिबेटवर त्याचा अधिकार आहे. चीनचा हा दावा तिबेटने फेटाळून लावला आहे. 1912 मध्ये, तिबेटचे धार्मिक नेते आणि 13 व्या दलाई लामा यांनी तिबेटला स्वतंत्र घोषित केलं. त्यावेळी चीनने कोणताही आक्षेप घेतला नव्हता. मात्र, तब्बल 40 वर्षांनंतर चीनमध्ये कम्युनिस्ट सरकार सत्तेवर आलं. या सरकारच्या विस्तारवादी धोरणांमुळे 1950 मध्ये चीनने हजारो सैनिकांसह तिबेटवर हल्ला केला. तिबेटवर चीनचा ताबा सुमारे 8 महिने चालू होता. त्यानंतर अखेर 1951 मध्ये तिबेटी धर्मगुरू दलाई लामा यांनी 17 कलमी करारावर स्वाक्षरी केली. या करारानंतर तिबेट अधिकृतपणे चीनचा भाग बनला. मात्र, दलाई लामांना हा करार मान्य नाही. दबावाखाली हा करार करण्यात आल्याचं त्यांचं म्हणणे आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

संबंधित बातम्या

वेब स्टोरीज