बौद्ध धर्मगुरू दलाई लामा – भाजप खासदार संबित पात्रा यांना मिळणार झेड श्रेणीची सुरक्षा

  • Written By: Published:
बौद्ध धर्मगुरू दलाई लामा – भाजप खासदार संबित पात्रा यांना मिळणार झेड श्रेणीची सुरक्षा

Dalai Lama Security: तिबेटी आध्यात्मिक नेते दलाई लामा (Dalai Lama) यांना गृह मंत्रालयाने (Home Ministry) झेड श्रेणीची सुरक्षा (Z Category Security) देण्याचा निर्णय घेतला आहे. आयबीने (IB) दलाई लामांना धोका असल्याची शक्यता वर्तवली होती. यानंतर मंत्रालयाने मोठा निर्णय घेत दलाई लामा यांना झेड श्रेणीची सुरक्षा दिली आहे.

दलाई लामा यांना झेड श्रेणीची सुरक्षा मिळाल्याने आता त्यांच्यासोबत 33 सुरक्षा कर्मचारी असणार आहे. ज्यामध्ये हिमाचल प्रदेशातील धर्मशाळा येथील त्यांच्या निवासस्थानी सशस्त्र स्थिर रक्षक तैनात असतील. याच बरोबर 24 तास सुरक्षा देणारे वैयक्तिक सुरक्षा अधिकारी आणि शिफ्टमध्ये सशस्त्र एस्कॉर्ट कमांडो यांचा समावेश असणार आहे. तसेच प्रशिक्षित चालक आणि देखरेख करणारे कर्मचारी त्यांच्या सुरक्षेत असणार असल्याची माहिती गृह मंत्रालयाने दिली आहे.

कोण आहेत दलाई लामा?

दलाई लामा हे 89 वर्षांचे तिबेटी आध्यात्मिक नेते आहेत. दलाई लामा शांततेवरील त्यांच्या शिकवणींसाठी आळखले जाते. जगात लाखो लोक त्यांना फॉलो करत आहे. त्यांना 1989 मध्ये नोबेल शांतता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 1959 पासून ते भारतात राहत आहे.

संबित पात्रा यांना देखील झेड श्रेणीची सुरक्षा

तर दुसरीकडे गृह मंत्रालयाने आणखी एक मोठा निर्णय घेत भाजप नेते संबित पात्रा यांना देखील झेड श्रेणीची सुरक्षा दिली आहे. ही सुरक्षा फक्त मणिपूरमध्ये उपलब्ध असणार आहे. संबित पात्रा (Sambit Patra) यांची देखील आयबीच्या अहवालाच्या आधारे सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

Valentine Day 2025 : व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने प्रेमाचा गोडवा घेऊन आला ‘गुलकंद’ चा टिझर

आता सीआरपीएफ (CRPF) कमांडो त्यांना सुरक्षा देणार आहे. गेल्या दोन वर्षांपासून मणिपूरमध्ये जातीय हिंसाचार सुरू आहे आणि एन. बिरेन सिंग यांच्या राजीनाम्यानंतर राज्यात आज राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आले आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube