खासदार महुआ मोइत्रा दुसऱ्यांदा विवाहबंधनात; जीवनसाथी 65 वर्षीय पिनाकी मिश्रा कोण?

Who is Pinaki Mishra : तृणमूल काँग्रेस खासदार महुआ मोइत्रा (Mahua Moitra) दुसऱ्यांदा लग्नबंधनात अडकल्या आहेत. त्यांनी सर्वोच्च न्यायालयाचे प्रसिद्ध वकील आणि बीजेडी (BJD) नेता पिनाकी मिश्रा (Pinaki Mishra) यांच्याशी जर्मनीमध्ये लग्न केल्याची माहिती समोर आली आहे. पिनाकी मिश्रा पुरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार देखील राहिले आहे. माहितीनुसार, पिनाकी मिश्रा यांचे हे दुसरे लग्न असून त्यांचे पहिले लग्न संगीता मिश्रा (Sangeeta Mishra) यांच्याशी झाले होते.
त्यांच्यापासून त्यांना दोन मुले आहे. पिनाकी मिश्रा ओडिसाचे माजी मुख्यमंत्री नवीन पटनायक यांच्या जवळच्या नेत्यांपैकी एक मानले जातात. माहितीनुसार, पिनाकी मिश्रा यांचे पहिल लग्न 1984 मध्ये संगीता मिश्रा यांच्याशी झाले होते. पिनाकी मिश्रा यांनी दिल्ली विद्यापीठाच्या सेंट स्टीफन कॉलेजमध्ये शिक्षण पूर्ण केले आहे. 1996 मध्ये पहिल्यांदा ते खासदार म्हणून निवडून आले होते त्यानंतर 2019 मध्ये त्यांनी पुरी मतदारसंघात त्यांनी भाजप नेते संबित पात्रा (Sambit Patra) यांचा पराभव केला होता.
तर दुसरीकडे त्यांनी देशातील विविध उच्च न्यायालयामध्ये (High Court) आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये (Supreme Court) अनेक महत्वपूर्ण खटले लढवले आहे. याचबरोबर पिनाकी मिश्रा खासदार असताना परराष्ट्र व्यवहारांशी संबंधित समितीव्यतिरिक्त अनेक समित्यांचे सदस्य राहिले आहे.
#Dil_toh_Bachha_hai_jii…
65 Years Pinaki Mishra & 50 Years Mahua Moitra get married.
Pinaki was a 4 times MP from Puri & Mahua now MP from Kisnanagar, WB. #PinakiMishra #Odisha #westbengal#mohuamitra #marriage #mp pic.twitter.com/9kA3B5QssV— Prashanjit Ray (@TweettoPR) June 5, 2025
जातीनिहाय जनगणनेची प्रक्रिया सुरू करा, निवडणूक डोळ्यासमोर ठेवून जुमलेबाजी करू नये
तर टीएमसी खासदार महुआ मोइत्रा यांचे देखील हे दुसरे लग्न आहे. महुआ मोइत्रा यांचे पहिले लग्न लार्स ब्रॉर्सन यांच्याशी झाले होते, माहितीनुसार, लार्स ब्रॉर्सन एक फायनान्सर असून ते मुळचे डेन्मार्कचे आहे. माहितीनुसार, लार्स ब्रॉनर्स यांच्याशी घटस्फोट झाल्यानंतर महुआ मोईत्रा वकील जय अंनत देहराय यांच्याशी रिलेशनशीपमध्ये होत्या. तर आता त्यांनी वयाच्या 50 व्या वर्षी दुसऱ्यांदा लग्न करत आयुष्याची नवीन सुरुवात केली आहे.