Mouse Jiggler : माऊस जिगलरनं आणलं नोकरीवर गंडांतर; वाचा ब्लूमबर्गचा रिपोर्ट

  • Written By: Published:
Mouse Jiggler : माऊस जिगलरनं आणलं नोकरीवर गंडांतर; वाचा ब्लूमबर्गचा रिपोर्ट

Mouse Jiggler : कोरोना महामराती जगभारतील अनेक कंपन्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना ‘वर्क फ्रॉम होम’ चा पर्याय उपलब्ध करून दिला होता. यामुळे महामारीच्या कठीण काळात करोडो कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला होता. मात्र, याकाळात काही कर्मचाऱ्यांनी माऊस जिलगरच्या सहाय्याने कंपन्यांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. या गंभीर प्रकरणानंतर फसवणुक करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर गडांतर आले आहे. याबाबत ब्लूमबर्गने एक रिपोर्ट प्रकाशित केला आहे. (What Is  Mouse Jiggler Technolgy How It Works)

राजस्थानच्या चाणाक्याला महाराष्ट्राची जबाबदारी; विधानसभेसाठी भाजपकडून राज्यात मोठे फेरबदल

चार वर्षांपूर्वी कोरोना महामारीच्या काळात, घरून काम करण्याचा ट्रेंड सुरू झाला, जो अजूनही अनेक कंपन्यांमध्ये सुरू आहे. बहुतेक कंपन्यांनी घरून काम करण्याची सुविधा बंद केली आहे पण काही कंपन्या अजूनही ही सुविधा देत आहेत. लोकांना घरून काम करणे सोयीचे आहे, परंतु बरेच लोक याचा फायदा देखील घेत आहेत. घरून काम करणारे काही कर्मचारी माऊस जिगलर तंत्रज्ञानाचा वापर करून कंपनीला फसवत असल्याचा प्रकार समोर आला आहे. यानंतर अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत.
माऊस जिगलर म्हणजे नक्की काय ते समजून घेऊया?

स्मार्टफोन एक व्यसनच, सुटकेसाठी Apple चे CEO टिम कूकने सुचवले ‘हे’ AI टूल

माऊस जिगलर म्हणजे काय?

ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार, वेल्स फार्गो नावाच्या कंपनीने डझनभर कर्मचाऱ्यांना कामावरून काढले आहे. या सर्व कर्मचाऱ्यांनी Mouse Jiggler सॉफ्टवेअरचा वापर केल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. माऊस जिग्लरला माउस मूवमेंट असेही म्हटले जाते. हे एक सॉफ्टवेअर आहे जे संगणकाला स्लीप मोडमध्ये जाण्यापासून रोखण्याचे करते आणि सतत कार्यान्वित ठेवते. नोकरीवरून काढून टाकण्यात आलेले कर्मचारी या तंत्रज्ञानाचा वापर करत होते असे वेल्स फार्गो कंपनीचा दावा आहे.

Melinda French Gates : महिलांच्या हक्कांसाठी मेलिंडा फ्रेंच गेट्स $1 अब्ज रुपये देणार

हे तंत्रज्ञान वापरून संबंधित कर्मचारी त्यांचा लॅपटॉप किंवा कम्युटर चालू ठेवत होते. पण प्रत्यक्षात ते काम करण्याऐवजी आराम करत होते. पण माऊस जिगलरचा वापर केला जात असल्याने संबंधित कर्मचारी अॅक्टिव असल्याचे कंपनीच्या स्क्रिन टाईम रिडरवर नोंदवले जात होते. माउस जिगलर हे बनावट कीबोर्ड अॅक्टिव्हिटी सॉफ्टवेअर आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube