सावधान! ऑफीसमध्ये उभे राहून काम करताय? मग, जाणून घ्या काय होतात साइड इफेक्ट्स..

सावधान! ऑफीसमध्ये उभे राहून काम करताय? मग, जाणून घ्या काय होतात साइड इफेक्ट्स..

Office Work : ऑफिसमध्ये डेस्क जॉब करणाऱ्या कर्मचाऱ्यांत डेस्कसमोर उभे राहून काम करण्याचा ट्रेंड वाढत चालला आहे. डेस्कसमोर तासनतास काम केल्याने शरीरात निष्क्रियता येते. ही निष्क्रियता कमी करण्यासाठी उभे राहून काम करणे फायदेशीर ठरते असे काही जणांचे म्हणणे आहे. काही जणांचे असेही म्हणणे आहे की सातत्याने एकाच जागेवर बसून काम केल्याने स्ट्रोक आणि हार्ट फेल्युर होण्याचा धोका असतो. थोडा वेळ उभे राहून काम केल्याने हा धोका कमी होतो.

परंतु आता एक नवीन अभ्यास समोर आला आहे. यामध्ये असे नमूद करण्यात आले आहे की उभे राहून काम केल्याने फार फायदा तर होत नाहीच उलट शरीराला नुकसानच होते. बराच काळ डेस्कसमोर उभे राहून काम केल्याने पायांच्या रक्तवाहिन्यांत सूज येते. त्यामुळे रक्ताच्या गाठी होण्याचा धोका असतो. ब्रिटनमधील 80 हजार लोकांवर हा अभ्यास करण्यात आला. यामध्ये असे आढळून आले की जास्त वेळ उभे राहून काम केल्याने स्ट्रोक आणि हार्ट फेल्योरसारख्या (Heart Disease) समस्यांचा धोका कमी होत नाही. परंतु बहुतांश लोकांचे असेच मानणे आहे.

सोने खरेदी का महत्त्वाची? ‘ही’ पाच कारणं ओळखा अन् सोन्यात गुंतवणूक कराच!

उभे राहून काम केल्याने नुकसान

सिडनी विद्यापीठाकडून करण्यात आलेल्या अभ्यासातून समोर आले की दिवसात दोन तासांपेक्षा जास्त वेळ उभे राहिले तर डीप व्हेन थ्रोम्बोसिस आणि व्हेरीकोज व्हेन्स सारख्या समस्या निर्माण होण्याचा धोका वाढतो. या अभ्यासाचे निष्कर्ष इंटरनॅशनल जर्नल ऑफ एपिडेमियोलॉजी मध्ये प्रकाशित झाले आहेत. सिडनी युनिव्हर्सिटीचे चिकित्सा आणि आरोग्य विभागाचे डॉ. मॅथ्यू अहमदी यांनी ब्रिटिश वृत्तपत्र गार्डीयनला सांगितले की जे लोक दीर्घकाळ बसलेले किंवा उभे राहत असतात त्यांना पूर्ण दिवस नियमितपणे शरीराच्या हालचाली केल्या पाहिजेत.

जास्त वेळ उभे राहिल्याने लाइफस्टाइलमध्ये कोणतीच सुधारणा होणार नाही. तर काही लोकांसाठी रक्त संचारात अडचणीचे ठरू शकते. या शोधात असेही दिसून आले आहे की दीर्घ काळ उभे राहिल्याने हृदयाशी संबंधित आरोग्यात काहीच सुधारणा होत नाही. रक्तसंचारा संबंधित समस्यांचा धोका जास्त वाढतो. या अभ्यासात सहभागी झालेल्या लोकांना सुरुवातीला हृदयविकार नव्हता. या लोकांच्या शारीरिक हालचालींवर नजर ठेवण्यासाठी त्यांच्या हातावर एक डिव्हाईस लावण्यात आली होती.

इंटेलिजन्स ब्युरोमध्ये 660 रिक्त पदांसाठी भरती सुरू, पगारही उत्तम, कोण करू शकतं अर्ज?

यानंतर शोध टीमच्या निदर्शनास आले की दोन तासांपेक्षा जास्त वेळ उभे राहिले तर दर अर्ध्या तासाला रक्त संचारासंबंधी आजारांची जोखीम 11 टक्क्यांनी वाढते. शोषकर्त्यांनी सांगितले की स्ट्रोक, हृदयाघात आणि कोरोनरी हृदयरोग यांसारख्या हृदयाशी संबंधित आजारांचा धोका कमी होत नसल्याचे दिसून आले आहे.

डेस्क जॉब कर्मचाऱ्यांनी मग काय करावं

सिडनी युनिव्हर्सिटीत मॅकेन्झी वेयरेबल्स रिसर्च हबचे निदेशक स्टामाटाकिस यांनी सांगितले की जे लोक नियमितपणे दीर्घकाळ बसून काम करतात त्यांनी मधून मधून उठलं पाहिजे. नियमित व्यायामही केला पाहिजे. नियमितपणे ब्रेक घ्या, मिटींगसाठी पायी चालत जा. पायऱ्यांचा वापर करा. दुपारच्या जेवणाचा वेळ डेस्कपासून दूर जाणे आणि लंचच्या वेळेचा उपयोग डेस्कपासून दूर जाण्यासाठी करा.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube