इंटेलिजन्स ब्युरोमध्ये 660 रिक्त पदांसाठी भरती सुरू, पगारही उत्तम, कोण करू शकतं अर्ज?

इंटेलिजन्स ब्युरोमध्ये 660 रिक्त पदांसाठी भरती सुरू, पगारही उत्तम, कोण करू शकतं अर्ज?

IB Recruitment 2024 : जर तुमचं इंटेलिजन्स ब्युरोमध्ये (Intelligence Bureau) नोकर करण्याचं स्वप्न असेल तर आता तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे, IB ने विविध पदांसाठी रिक्त जागा जाहीर केल्या आहेत. आयबी अंतर्गत एकूण 660 पदे भरली जाणार आहे. इंटेलिजन्स ब्युरोने या भरती प्रक्रियेसाठी अधिसूचना जारी केली आहे. या भरतीची प्रक्रियेसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. दरम्यान, या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख काय? कधी पर्यंत करता येणार अर्ज? अर्ज करण्यासाठी पात्रता काय? याच विषयी जाणून घेऊ.

Bihar News : तेजस्वी यादव जोमात! निवडणुकीधीच व्हीआयपी-राजदची नवी इनिंग 

ही भरती प्रक्रिया तब्बल ६६० पदांसाठी पार पडत आहे. या भरतीप्रक्रियेसाठी इच्छुक उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. उमदेवार www.mha.gov.in या संकेतस्थळावर जाऊन भरती प्रक्रियेची माहीती जाणून घेऊ शकतात.

रिक्त पदांचा तपशील
या भरतीअंतर्गत सेंट्रल इंटेलिजन्स ऑफीसर, कनिष्ट गुप्तचर अधिकारी,सरक्षा अधिकारी या पदांसह अन्य विविध पदे भरली जाणार आहेत.
असिस्टंट सेंट्रल इंटेलिजन्स ऑफिसर – 80 पदे
असिस्टंट सेंट्रल इंटेलिजन्स ऑफिसर (सिव्हील वर्क) – 3 पदे
असिस्टंट सेंट्रल इंटेलिजन्स ऑफिसर (exe) – 136 पदे
कनिष्ट गुप्तचर अधिकारी -I {MT} – 22 पदे.
कनिष्ट गुप्तचर अधिकारी – I {Exe} – 120 पदे
शेफ (स्तर 3) – 10 पदे.

Neha Malik : नेहा मलिकचा हॉट अवतार

कनिष्ठ गुप्तचर अधिकारी {XE} – १७० पदे.
केअरटेकर (स्तर ५) – ५ पदे.
सुरक्षा सहाय्यक {Exe (स्तर 3)} – 100 पदे.
पर्सनल असिस्टंट (स्तर 7) – 5 पदे.
कनिष्ठ गुप्तचर अधिकारी II {टेक (स्तर 7)} – 8 पदे.
प्रिंटिंग-प्रेस-ऑपरेटर (स्तर 2) – 1 पोस्ट.

शैक्षणिक पात्रता
या भरतीसाठी दहावी पास ते पदवीधर उमेदवार अर्ज करू शकतात. तपशीलवार शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचा.

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 28 मे 2024 आहे. इच्छुक उमेदवारांनी आधी अधिसूचनाव वाचावी. त्यानंतर अर्ज करावा. कारण, उशीरा आलेले अर्ज नाकारले जातील, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.

अधिसूचना-
https://www.mha.gov.in/sites/default/files/IBCcircular_15032024.pdf

अर्ज कुठे पाठवायचा?

इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी कागदपत्रांसह आपला अर्ज ६० दिवसांच्या आत पुढील पत्त्यावर पाठवावा.

पत्ता: संचालक/G-3, इंटेलिजन्स ब्युरो, गृह मंत्रालय, 35 एसपी मार्ग, बापू धाम, नवी दिल्ली-110021.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube