इंटेलिजन्स ब्युरोमध्ये मेगा भरती, 700 हून अधिक जागांसाठी नोटिफिकेशन जारी, 81 हजार महिन्याला पगार
India’s intelligence department job recruitment starts : इंटेलिजन्स ब्युरोमध्ये (Intelligence Bureau) नोकरी मिळवण्याची इच्छा जवळपास प्रत्येक तरुणाला असते. मात्र, आजच्या स्पर्धेच्या युगात सरकारी नोकरी मिळवणं हे अवघड काम झालं. मात्र, इंटेलिजन्स ब्युरोमध्ये चांगले पद आणि पगाराची नोकरी शोधत असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. इंटेलिजन्स ब्युरो भरतीसाठी गृह मंत्रालयाने (Ministry of Home Affairs) अधिसूचना जाहीर केली आहे. या भरती अंतर्गत कनिष्ठ गुप्तचर अधिकारी (आरओ), ग्रेड-II (तांत्रिक) या पदांची भरती केली जाणार आहे. या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. भरतीसाठी आवश्यक असलेली शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, नोकरीचे ठिकाण याबद्दलची सविस्तर माहिती नोटिफिकेशनमध्ये देण्यात आली.
पदाचे नाव –
कनिष्ठ गुप्तचर अधिकारी (RO), ग्रेड-II (तांत्रिक)
पदांची संख्या – 797 जागा
नोकरी ठिकाण – मुंबई, नागपूर
वयोमर्यादा – 18 ते 27 वर्ष
अर्ज शुल्क –
UR, OBC आणि EWS पुरुष उमेदवार – रु. 550
इतर प्रवर्गातील उमेदवार आणि महिला – रु.450.
कागदपत्रे आवश्यक-
बायोडेटा), 10वी, 12वी आणि पदवी प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला, जात प्रमाणपत्र (मागास उमेदवारांसाठी) , ओळखपत्र (आधार कार्ड, परवाना) आणि पासपोर्ट आकाराचे छायाचित्र
Vitamins Deficiency : सावधान! तुमच्या शरीरात ‘या’ व्हिटॅमिनची कमतरता ठरू शकते निद्रानाशास कारणीभूत
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाइन
पात्र उमेदवारांनी या पदभरतीसाठी अर्ज करण्यापुर्वी संस्थेने संकेतस्थळावर प्रसिध्द केलेले जाहिरातीचे नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. त्यानंतरच अर्ज भरावा. कारण, अर्जामध्ये काही त्रुटी असल्यास संबंधित अर्ज बाद करण्यात येईल याची उमेदवारांनी नोंद घ्या.
शैक्षणिक पात्रता –
कनिष्ठ गुप्तचर अधिकारी (RO), ग्रेड-II (तांत्रिक) पदासाठी अभियांत्रिकी विषयात डिप्लोमा असणं आवश्यक आहे. (ECE/ EEE/ IT/ CS)
किंवा B.Sc कॉम्प्युटर ऍप्लिकेशनमधील पदवी असावी.
उमदेवारांनी शैक्षणिक पात्रतेसाठी मुळ जाहिरात पाहावी.
पगार –
या भरतीअंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना 25 हजार 500 ते 81 हजार 100 रुपये पगार मिळेल.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 23 जून 2023
अधिकृत वेबसाइट – http://www.mha.gov.in