Vitamins Deficiency : सावधान! तुमच्या शरीरात ‘या’ व्हिटॅमिनची कमतरता ठरू शकते निद्रानाशास कारणीभूत

Vitamins Deficiency : सावधान! तुमच्या शरीरात ‘या’ व्हिटॅमिनची कमतरता ठरू शकते निद्रानाशास कारणीभूत

Vitamins Deficiency Cuase of Insomnia : झोप ही आपल्या शरीरासाठी जेवणा इतकीच आवश्यक गोष्ट आहे. पुरेशी झोप न घेणे अनेक आजारांना आमंत्रण देणारे ठरते. त्यामुळे अशी म्हण देखील रूढ आहे. की, लवकर निजे लवकर उठे त्यास आरोग्य लाभे. मात्र अनेकांना झोप न येण्याचीच समस्या असते. झोप न येण्याच्या या आजाराला ‘निद्रानाश’ म्हणतात. त्यामुळे या लोकांची चिडचिड होणे, डोळ्याखाली काळी वर्तुळे येणे, जेवण न जाणे, अशक्तपणा, तसेच सारखी झोप येणे यांसारख्या समस्यांना सामोरे जावे लागते.

Manohar Joshi Health Update : “पुढचे 24 तास महत्वाचे”; डॉक्टरांनी दिली महत्वाची माहिती

निद्रानाशाची कारणे :

तुमच्या शरीरामध्ये व्हिटॅमिन डी आणि व्हिटॅमिन बी 6 ची कमतरता असेल तर तुम्हाला निद्रानाश होऊ शकतो. तसेच मेंदुतील मेलाटोनिन आणि सेरोटोनिन यांची पातळी कमी झाल्याने देखील निद्रानाश होऊ शकतो.

व्हिटॅमिन्सची कमतरता दूर करण्यासाठी काय कराल?

शरिराला आवश्यक असणारे व्हिटॅमिन डीची कमतरता दुर करण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारामध्ये मासे, अंड्यातील पिवळा भाग, मशरूम, गायीचे दूध, सोया मिल्क, संत्र्याचा रस, आणि ओटमील यांचा समावेश करणे अत्यंत गरजेचे आहे. त्याचबरोबर सकाळच्या कोवळ्या उन्हात बसले तर व्हिटॅमिन डी आपल्या शरीराला मिळू शकते.

Health : उन्हाळ्यात त्वचा काळवंडली? ट्राय करा ‘हे’ उपाय

त्याचबरोबर व्हिटॅमिन बी 6 ची कमतरता असेल तर तुम्हाला निद्रानाश होऊ शकतो. त्यामुळे व्हिटॅमिन बी 6 ची कमतरता दुर करण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारामध्ये चिकन, सोयाबीन, ओट्स आणि भुईमूग यांचा समावेश करणे अत्यंत गरजेचे आहे.

World Health Day : टोन्ड बॉडी मिळवण्यासाठी ‘या’ सेलिब्रेटीचे जाणून घ्या सिक्रेट्स

त्याचबरोबर तुम्हाला निद्रानाशाची समस्या वाढत आहे असं वाटत आहे. किंवा या आजाराच्या सुरूवातीच्या लक्षणांनंतर लगेचच डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे. कारण त्यावर तात्काळ उपचार सुरू झाल्यास अनेक आजारांना निमंत्रण मिळणार नाही. तसेच निद्रानाशही लवकर नियंत्रणात येईल

निद्रानाशाची प्राथमिक लक्षण :

निद्रानाशाच्या प्राथमिक लक्षणांमध्ये दिवसा झोप येणे, राग, थकवा, लक्ष केंद्रित करण्यात अडचण येणे यांचा समावेश होतो.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube