World Health Day : टोन्ड बॉडी मिळवण्यासाठी ‘या’ सेलिब्रेटीचे जाणून घ्या सिक्रेट्स
World Health Day 2023 : दरवर्षी ७ एप्रिल हा दिवस जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्याची सुरुवात जागतिक आरोग्य संघटनेने १९५० मध्ये केली होती आणि त्याचा मुख्य उद्देश जागतिक आरोग्य आणि त्याच्याशी संबंधित समस्यांवर विचार करणे हा आहे. शरीर तंदुरुस्त आणि निरोगी ठेवण्यासाठी सेलिब्रिटीज, खेळाडू टोन्ड बॉडी मिळवण्यासाठी अनेक प्रकारचे व्यायाम करत असतात.
View this post on Instagram
शिल्पा शेट्टीच्या (Shilpa Shetty) सुंदर दिसण्याचा आणि टोन्ड बॉडीचा आपल्या सर्वांना हेवा वाटतो. चाळीशीत असतानाही तिने स्वत:ला इतके तंदुरुस्त आणि निरोगी ठेवण्यात यशस्वीरित्या व्यवस्थापित केले आहे. तिच्याकडे निर्दोष त्वचा आणि निरोगी शरीर आहे. ती तिच्या दिवसाची सुरुवात एका ग्लास कोमट पाण्याने करते आणि नंतर पटकन तयार होणारा एखादा नाश्ता तयार करते. यासाठी ती ब्रेडचा वापर करत नाही, म्हणून ती सहसा सकाळी फळे आणि म्यूसलीकडे वळते.
View this post on Instagram
तिचा म्यूसली बाउल फळांनी भरलेला असतो. तिला नाश्त्यात अंडी खाणे देखील आवडते कारण ते प्रथिनांचे उत्तम स्त्रोत आहेत आणि दिवसभर तिला खूप ऊर्जा देतात. शिल्पा शेट्टी ही सर्वांसाठी प्रेरणा आहे, विशेषत: तिच्या वयाच्या महिला ज्यांना तिच्यासारखे दिसायचे आहे. आता तुम्हाला शिल्पाच्या फिटनेसचे रहस्य माहित आहे, ते तुमच्या आहारात समाविष्ट करा आणि तुम्ही हळूहळू तिच्यासारखे टोन्ड आणि निरोगी शरीर कसे मिळवता ते तुम्हाला दिसेल!
आज विराट कोहली (Virat Kohli) जगभरात फिटनेस आयकॉन म्हणून ओळखला जातो. पूर्वी त्याचे वजन जास्त होते, परंतु हार्ड वर्कने त्याचे वजन कमी झाले आहे. तो जिममध्ये हाय इंटेन्सिटी कार्डिओ एक्सरसाइज करत असतो. आहारात कमी कार्ब आहार घ्यायचा, हेल्दी फॅट. तंदुरुस्त शरीर, टोन्ड स्नायू बनवण्यासाठी कोहलीप्रमाणेच तुम्ही हेवी वेट लिफ्टिंग करू शकता.
View this post on Instagram
निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी विराट आपल्या आहारात पौष्टिक गोष्टींचा समावेश करतो. त्याच्या आहारात कडधान्ये, हिरव्या भाज्या, क्विनोआ, पालक, अंडी, बदाम, डोसे इ. पदार्थ असतात. मात्र, त्याला चायनीज फूडही आवडते. यासोबतच तो प्रोटीन बार, कॉफी पिण्याचाही शौकीन आहे.
View this post on Instagram
सलमान खान (Salman Khan) हा हिंदी सिनेसृष्टीतील पन्नाशी पार केलेला मोस्ट एलिजेबल बॅचलर ! गेल्या २५ वर्षांहूनही अधिक काळ रसिकांच्या मनावर दिवसेंदिवस अधिराज्य करणारा दबंगस्टार सलमानची स्टाईल आणि फीटनेस सिक्रेटमुळेही अनेकदा चर्चेत राहतो. सलमान खानच्या या शरीराचे रहस्य हे त्याच्या अनेक वर्षांच्या मेहनतीचे फळ आहे. तो कठीण प्रशिक्षण वर्कआउट करतो जे सहसा काही लोक करतात.
View this post on Instagram
सलमान रोज २ हजार सिट-अप करतो, १ हजार पुश अप करतो. तो चिन-अप आणि पुल-अप आणि ५०० पोट क्रंच देखील करतो. सलमान रोज किमान ३ तास वर्कआउट करतो. जिममध्ये त्याचे बहुतेक लक्ष एब्स, बाइसेप्स, ट्राइसेप्सवर जास्त भर देतो.
View this post on Instagram
बॉलिवूडमध्ये येण्याआधी अक्षय कुमार (Akshay Kumar) एक मार्शल आर्ट तज्ज्ञ होता. त्यामुळे त्याचा फिटनेससोबतचा संबंध आणखी मजबूत झाला. अक्षयची शानदार टोन्ड बॉडी आणि तरूण दिसण्यामागे एक नाही तर बरीच कारणं काम करतं. कदाचित त्याच्या काळात हा एकमेव बॉलिवूड स्टार होता ज्यानं बर्याच सिनेमांमध्ये स्वत: हूनच स्टंट केले आणि आपण किती फिट आहे हे सिद्ध केले. त्याचा फिटनेस मंत्र, रात्रीची चांगली झोप, निरोगी आहार आणि शिस्तबद्ध दिनचर्या आहे. अक्षय कुमार सर्व खाण्यावर विश्वास करतो. मात्र तो सर्व योग्य वेळेवर आपलं खाणं खातो.
अनुष्का शर्माचे करिअर संपवायचे होते, करण जोहरच्या व्हिडिओवर दिग्दर्शकाची प्रतिक्रिया
तो प्रत्येक दिवशी संध्याकाळी ७ वाजण्याआधी आपलं रात्रीचं जेवण करतो. त्यानंतर तो काहीच खातं नाही. जरीही अक्षय कधी पार्टीला किंवा शूटिंगसाठी बाहेर असेल तरी तो रूटीन डाएटमध्ये काहीच बदल करत नाही. याव्यतिरिक्त अक्षय कधीच मद्यपान, सिगरेट एवढंच काय तर कॅफिन घेत नाही. अक्षय कुमार चहा आणि कॉफीपासूनही दूर राहतो. अक्षयचं म्हणणं आहे की, जर तुम्ही धूम्रपान करता किंवा मद्यपान केले तर व्यायामासाठी तुमच्याकडे सहनशक्ती नसते.