काय तु्म्ही सुद्धा 6 तासांपेक्षा जास्त वेळ बसून काम करता? मग, ‘या’ आजारांचा नक्कीच धोका

Sitting Continuously more than 6 Hours : आजच्या लाइफस्टाइलमध्ये तासनतास एकाच जागेवर बसून काम करणे अगदी कॉमन झाले आहे. ऑफीस असो की घर सहा ते आठ ता बसून लॅपटॉप किंवा मोबाइलवर काम सुरुच असते. पण तुम्हाला माहिती आहे का की तुमच्या या सवयीची तुमच्या आरोग्यावर अतिशय विपरीत परिणाम होत आहे. रिसर्च सांगतो की दररोज सहा तासांपेक्षा जास्त वेळ एकाच जागी बसून राहत असाल तर अशा व्यक्तींमध्ये मधुमेह, लठ्ठपणा आणि हृदयाशी संबंधित आजारांचा धोका वाढत जातो. आज याच निमित्ताने काही महत्वाच्या गोष्टी जाणून घेऊ तसेच एकाच जागी तासनतास बसून राहण्याची सवय कशी टाळता येईल याची माहिती घेऊ..
‘या’ आजारांचा धोका वाढतोय
जर तुम्ही एकाच जागी तासनतास बसून काम करत असाल तर वजन वाढण्याची दाट शक्यता असते. कारण शरीरातील कॅलरी बर्न होण्याची प्रक्रिया मंद होते. यामुळे कंबर आणि पोटाच्या आसपासच्या भागात चरबी जमा होत राहते. यामुळे वजन वेगाने वाढते.
काही अभ्यासांत असे दिसून आले आहे की सातत्याने एकाच जागी बसून राहिल्याने हृदयाशी संबंधित आजार होण्याची शक्यता 30 टक्क्यांनी वाढते. तासनतास एकाच जागी बसून राहिल्याने शरीरातील ब्लड सर्कुलेशन मंद होते. यामुळे कोलेस्टेरॉल वाढत जाते आणि हार्ट अटॅक येण्याचा धोका वाढत जातो.
जे लोक एकाच जागी बराच वेळ बसून राहतात. शरीराची आजिबात हालचाल करत नाहीत अशा लोकांच्या शरीरातील मेटाबॉलिज्म मंद होते. यामुळे शरीरात इन्सुलिन तयार होण्याची क्षमता कमी होत जाते. परिणामी रक्तातील साखरेचे प्रमाण वाढत जाते. यामुळे टाईप 2 डायबिटीज होण्याचा धोका बळावतो.
टॅटू काढताय मग, आताच सावध व्हा, ‘लिंफोमा’ कॅन्सरचा धोका; रिसर्चमधून धक्कादायक खुलासा
सारखे एकाच जागी बसून राहत असाल तर पाठीच्या कण्यावर ताण पडतो. यामुळे पाठदुखी, कंबरदुखी, मानदुखी होऊ शकते. दीर्घ काळ चुकीच्या पद्धतीने बसून राहिल्याने स्पायनल प्रॉब्लेम होऊ शकतात.
तसेच संबंधित व्यक्तीच्या मानसिक आरोग्यावरही परिणाम होतो. शारीरीक हालचाली कमी झाल्यास मेंदूत रक्त प्रवाह कमी होऊ शकतो. यामुळे तणाव, चिंता, डिप्रेशन यांसारख्या समस्या वाढण्याची शक्यता असते.
या धोक्यापांसून कसा कराल बचाव
एकाच जागी तासनतास बसून राहिल्याने शरीराचे आणि एकूणच आरोग्याचे किती नुकसान होते याची माहिती तर घेतलीच पण आता या धोक्यांपासून कसे सुरक्षित राहता येईल यासाठी काय करता येईल याची माहिती घेऊ या.
तुम्हाला जर एकाच जागी बसून बराच वेळ काम करायचे असेल तर प्रत्येक 30 ते 40 मिनिटांनंतर ब्रेक घेत चला. या काळात दोन ते तीन मिनिट फिरा. हलके स्ट्रेचिंग एक्सरसाइज करा. वर्क स्टेशनमध्ये बदल करा. उभे राहून काम करण्याचा प्रयत्न करा. शारीरीक हालचाली वाढतील याची काळजी घ्या. ऑफीसमध्ये लिफ्टने जात असाल तर पायऱ्यांचा वापर केल्यास फायदेशीर ठरेल. ऑफीस किंवा घरात चालत चालत काम करा. व्यायाम करण्याची सवय लावून घ्या. दररोज किमान अर्धा तास चालणे किंवा योगा करा.
डॉक्टर पांढरा आणि वकील काळा कोट का घालतात? माहितीये का, वाचा सविस्तर…