Dalai Lama : गौतम बुद्ध आणि भगवान महावीर एकाच आईचे जुळे अपत्य…

Dalai Lama : गौतम बुद्ध आणि भगवान महावीर एकाच आईचे जुळे अपत्य…

Dalai Lama : भगवान गौतम बुद्ध आणि भगवान महावीर एकाच आईचे दोन जुळे अपत्य असल्याचं बौद्ध धर्मगुरु दलाई लामा (Dalai Lama) यांनी म्हटलं आहे. बुद्धपोर्णिमेच्या पूर्वसंध्येला जैन धर्मीय आंतरराष्ट्रीय आचार्य लोकेश यांच्यासह इतर धर्माचार्यांची दलाई लामा यांच्या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी दलाई लामा (Dalai Lama) यांनी विधान केलं आहे.

Kairi : लंडनमध्ये संपन्न झाले ‘या’ नव्या सिनेमाचे चित्रीकरण

पुढे बोलताना दलाई लामा (Dalai Lama) म्हणाले, मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम, बुद्ध, महावीर, नानक अशा अनेक महापुरुषांनी भारतभूमीवर जन्म घेऊन जगाला प्रेम आणि बंधुत्वाचा मार्ग दाखवला आहे. तसेच भगवान बुद्धांच्या करुणा आणि भगवान महावीर यांच्या अहिंसेच्या तत्वज्ञानाने दाखवलेल्या मार्गानेच जगात शांतता आणि सद्भावना प्रस्थापित होऊ शकणार असल्याचंही ते म्हणाले आहेत.

Sharad Pawar Retairment : राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवारच राहणार? समितीने केला ठराव

दलाई लामा (Dalai Lama) यांची भेट घेतलेल्या इतर धार्मिक नेत्यांनी लामा यांना बुद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या देत जगात शांतता आणि सलोख्यासाठी बुद्ध आणि महावीरांच्या शिकवणुकीची नितांत गरज असल्याचं जैन आचार्य डॉ़. लोकेश यांनी म्हंटलं आहे.

SRH vs KKR : रिंकू आणि नितीशची धडाकेबाज खेळी, कोलकाताचे हैदराबादसमोर 172 धावांचे लक्ष्य

दरम्यान, जागतिक राजदूत आचार्य लोकेश जून महिन्यापासून अमेरिकेत शांतता सदिच्छा दौरा सुरु करणार असल्याची माहिती हिलालयीन कल्चरल सेंटरचे अध्यक्ष एल.पी. पोंटसांग यांनी दिली. या दौऱ्यादरम्यान आचार्य लोकेश जागतिक शांततेचा प्रचार आणि प्रसार करणार आहेत.

तसेच अहिंसा विश्व भारती संस्थेतर्फे गुरुग्राममध्ये भारतातील पहिले जागतिक शांतता केंद्र स्थापन करण्यात येत असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिलीय.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube