बांधवगड राष्ट्रीय उद्यानच्या कर्मचाऱ्यांसाठी धावून आला ‘पुनीत बालन ग्रुप’, कोट्यवधींचे विमा कवच प्रदान
Punit Balan Group gives Insurance Employees of Bandhavgad National Park : नेहमीच आपल्या सामाजिक कार्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या ‘पुनीत बालन ग्रुप’ने (Punit Balan Group) आपल्या सामाजिक कार्यात आणखी एक नवे पाऊल टाकले असून वन्यजीव पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या बांधवगड राष्ट्रीय उद्यानात काम करणाऱ्या तब्बल अकराशे कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी 15 वर्षांसाठी ‘जीवन विमा पॉलिसी’ काढून त्यांना 8.5 कोटी रुपयांपर्यंतचे सुरक्षेचे कवच बहाल केले आहे.
Natasa Divorce: हार्दिकनंतर नताशकडूनही घटस्फोटाच्या चर्चांना दुजोरा ? म्हणाली, ‘तुझ्या आयुष्यात…’
बांधवगढ राष्ट्रीय उद्यान हे मध्य प्रदेशातील उमरिया जिल्ह्यातील राष्ट्रीय उद्यान आहे. बांधवगड 716 चौ. किलोमीटर क्षेत्रफळ असलेले, 1968 मध्ये राष्ट्रीय उद्यान म्हणून घोषित करण्यात आले. त्यानंतर 1993 मध्ये हे उद्यान व्याघ्र प्रकल्प बनले. वन्यजीव आणि पर्यावरणाबाबत विशेष प्रेम असलेल्या ‘पुनीत बालन ग्रुप’चे अध्यक्ष पुनीत बालन यांच्याकडून या राष्ट्रीय उद्यानाला यापूर्वी २० लीफ ब्लोअर मशीन भेट दिल्या आहेत. जंगलात आग लागल्यास आग विझवण्यासाठी या लीफ ब्लोअर मशीनचा मोठा ऊपयोग होतो. येथील वन विभागाचे कर्मचारी हे आपला जीव धोक्यात घालून वेगवेगळ्या विभागात काम करतात. त्यामुळे येथील अकराशे कर्मचाऱ्यांना ‘पुनीत बालन ग्रुप’चे अध्यक्ष पुनीत बालन यांच्याकडून 15 वर्षांसाठी विमा कवच बहाल करण्यात आले आहे. या मदतीबाबत कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांनी बालन यांच्याविषयी कृतज्ञतेची भावना व्यक्त केली.
Kalki 2898 AD: कधी अन् किती वाजता ओटीटीवर स्ट्रीम होणार ‘कल्की 2898 एडी’? उत्सुकता शिगेला
नुकत्याच झालेल्या एका समारंभात युवा उद्योजक पुनीत बालन यांनी विमा सुरक्षेबाबतची घोषणा केली. यावेळी उद्यानाचे अपर मुख्य वनरक्षक डॉ. बी. एस. अन्नीगेरी, मुख्य वन संरक्षक आणि क्षेत्र संचालक एल. एल. उईके, प्रधान मुख्य वनरक्षक अतुल श्रीवास्तव, एसडीओ सुधी मिश्रा, नरसी ग्रुपचे नरसी डी. कुलरिया, वास्तूविशारद अनुज वकील, डीडी बीटीआर प्रकाश वर्मा, एसडीओ बीटीआर सुधीर मिश्रा, आरओ बीटीआर पुष्पा सिंग आणि डॉ. रमाकांत पांडा यावेळी उपस्थित होते.
यावर बोलताना पुनीत बालन ग्रुपचे प्रमुख पुनीत बालन म्हणाले की, वन्यजीव ही आपली खऱ्या अर्थाने संपत्ती आहे. बांधवगड राष्ट्रीय उद्यानात अनेक दुर्मिळ असे पशुपक्षी आहेत. महत्वाचं म्हणजे आपला राष्ट्रीय प्राणी वाघांची संख्या सर्वांत जास्त याच उद्यानात आहे. या सर्वांची चांगल्या पध्दतीने काळजी घेता यावी आणि त्यांच्यासाठी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही सरक्षण मिळावं या भावनेतून ही छोटी मदत करण्याचा मी प्रयत्न केला.