श्रीगणरायाला निरोप देण्यासाठी मुंबई सज्ज!पालिकेकडून विसर्जनसाठी 10 हजार अधिकारी-कर्मचाऱ्यांची नेमणूक

श्रीगणरायाला निरोप देण्यासाठी मुंबई सज्ज!पालिकेकडून विसर्जनसाठी 10 हजार अधिकारी-कर्मचाऱ्यांची नेमणूक

Mumbai ready to bid farewell to Shri Ganesh! Municipal Corporation appoints 10,000 officers and employees for immersion : राज्यभर सध्या गणेशोत्सवाचा उत्साह शिगेला पोहचलेला आहे. त्यात आता विसर्जन जवळ आहे. त्या पार्श्वभूमीवर अनंत चतुर्दशीदिनी (दि. ६ सप्टेंबर २०२५) होणाऱ्या श्रीगणेशमूर्ती विसर्जनासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने व्यापक तयारी केली आहे. विसर्जन सुलभ आणि निर्विघ्न पार पडावे यासाठी महापालिका प्रशासनाकडून विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

‘लव्ह अँड वॉर’ आंतरराष्ट्रीय स्तरावर नेणार, क्लायमॅक्स शूटसाठी भन्साळी पोहचले इटलीमध्ये

विसर्जन स्थळांची संख्या

– मुंबई शहर आणि उपनगरांत ७० नैसर्गिक स्थळं

– सुमारे २९० कृत्रिम तलावांची निर्मिती

– महापालिकेने भाविकांना मूर्ती विसर्जनासाठी कृत्रिम तलावांचा अधिक वापर करण्याचे आवाहन केले आहे.

महिला क्रिकेट वर्ल्डकपसाठी आयसीसीचा मोठा निर्णय; मिळणार 125 कोटींचं बक्षीस

मानवी आणि तांत्रिक संसाधने

– १० हजार अधिकारी-कर्मचारी विसर्जनस्थळी कार्यरत

– २४५ नियंत्रण कक्ष आणि १२९ निरीक्षण मनोरे

– ४२ क्रेन आणि २८७ स्वागत कक्ष

मोठी बातमी! जीआरच्या विरोधात ओबीसींमध्ये संतापाची लाट; लक्ष्मण हाके यांनी GR फाडला

सुरक्षेसाठी व्यवस्था

– २,१७८ जीवरक्षक, ५६ मोटरबोटी

– १,१७५ स्टील प्लेट्स व ६६ जर्मन तराफे चौपाट्यांवर

– ५९४ निर्माल्य कलश आणि ३०७ निर्माल्य वाहनं

मोठी बातमी! मनोज जरांगेंच्या मागण्या मान्य होताच ओबीसीआक्रमक; सरकारने घेतला मोठा निर्णय

आरोग्य व सुविधा

– २३६ प्रथमोपचार केंद्रं

– ११५ रुग्णवाहिका सज्ज

– ६,१८८ फ्लडलाईट्स, १३८ सर्चलाईट्स

– १९७ तात्पुरती शौचालये

पोलीस कर्मचाऱ्यांना गुडन्यूज! फौजदार होण्याचा मार्ग मोकळा; बंद केलेली विभागीय परीक्षा पुन्हा सुरू

नागरिकांसाठी सोयी

कृत्रिम तलावांची माहिती महापालिकेच्या संकेतस्थळावर व गुगल मॅप लिंक्ससह उपलब्ध असून QR कोड किंवा बीएमसी व्हॉट्सअॅप चॅटबॉट (८९९९-२२-८९९९) द्वारेही मिळवता येईल.

विशेष सूचना

– समुद्रकिनाऱ्यांवर ऑगस्ट-ऑक्टोबर या काळात ‘ब्लू बटन जेलीफिश’ व ‘स्टिंग रे’ माशांचा वावर आढळतो. मत्स्यदंश टाळण्यासाठी नागरिकांनी काळजी घ्यावी.

भरती-ओहोटीच्या वेळा लक्षात ठेवाव्यात :

६ सप्टेंबर रोजी सकाळी ११.०९ वा. – ४.२० मीटर भरती,

सायं. ५.१३ वा. – १.४१ मीटर ओहोटी,

रात्री ११.१७ वा. – ३.८७ मीटर भरती.

ओबीसी आरक्षणावर सरकारचा दरोडा, गुगलीने कुणाला फसवलं?, हरिभाऊ राठोडांनी स्पष्टच सांगितलं

भाविकांनी घ्यावयाची काळजी

१. खोल पाण्यात जाणे टाळावे.
२. प्रशिक्षित मनुष्यबळाची मदत घ्यावी.
३. अंधारात विसर्जनासाठी जाऊ नये.
४. निषिद्ध क्षेत्रात प्रवेश करू नये.
५. अपघात वा बुडण्याची घटना दिसल्यास त्वरित पोलिस, जीवरक्षक वा अग्निशमन दलाला कळवावे.
६. अफवा पसरवू नयेत.
७. लहान मुलांची विशेष काळजी घ्यावी.

मोठ्या बिझनेसला टाळं लावलं, 60 कोटींच्या फसवणूक प्रकरणात गंभीर आरोप, शिल्पा शेट्टीचा मोठा निर्णय

महानगरपालिका आणि मुंबई पोलीस दलाकडून वेळोवेळी दिल्या जाणाऱ्या सूचनांचे पालन करून विसर्जन उत्सव शांततेत व सुरळीत पार पाडण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube