ओबीसी आरक्षणावर सरकारचा दरोडा, गुगलीने कुणाला फसवलं?, हरिभाऊ राठोडांनी स्पष्टच सांगितलं

ओबीसी आरक्षणावर सरकारचा दरोडा, गुगलीने कुणाला फसवलं?, हरिभाऊ राठोडांनी स्पष्टच सांगितलं

Haribhau Rathod on Maratha Reservation : ‘मनोज जरांगे पाटील यांनी (Manoj Jarange Patil) आरक्षणाची लढाई जिंकली याचा अर्थ ओबीसी हरले आहेत. जरांगे जिंकले आणि भुजबळ हरले आहेत. राज्य सरकारने जो निर्णय घेतला तो अत्यंत चुकीचा आहे. सरकारने गुगली टाकली. सरकारने एकतर जरांगेंना फसवलं किंवा ओबीसींना तरी फसवलं. हैद्राबाद गॅझेटसंबंधी जीआर काढून मागच्या दाराने जर मराठा समाजाचे ओबीसीकरण करणं चालू असेल तर भटके विमुक्त, लहान लहान जाती यांच्या आरक्षणावर डल्ला मारण्याचा हा मोठा डाव होता आणि हा डाव सरकारने साधलेला आहे. यामुळे आता ही लढाई पुन्हा ओबीसी आणि मराठा, ओबीसी विरुद्ध सरकार अशी चालूच राहणार आहे. यातून फार मोठा अन्याय ओबीसी समाजावर झाला आहे.’, अशा शब्दांत ओबीसी आरक्षणाचे अभ्यासक हरिभाऊ राठोड यांनी राज्य सरकारवर तोफ डागली आहे.

यातून ओबीसीचं कधीही भरून न निघणारं नुकसान झालं आहे. मागच्या वेळी देखील या लोकांनी (राज्य सरकार) मनोज जरांगे यांना अशीच शेंडी लावली होती असं म्हटलं तरी चालेल. याही वेळेस तेच केलं आहे. एकतर असंच झालं असेल किंवा ओबीसींवर अन्याय तरी झाला. ओबीसी आरक्षणाला धक्का लागू देणार नाही असं म्हटल्यानंतर सरकारने ओबीसींना हा प्रचंड मोठा धक्का दिला आहे. यातून ओबीसींचे राजकीय नुकसान होणार आहे. तसेच लहान लहान जातींचं आरक्षण हडपण्याचं कारस्थान सरकारने केलं आहे असा गंभीर आरोप हरिभाऊ राठोड यांनी केला.

Maratha Reservation : “माझा फॉर्म्युलाच सोप्पा, फक्त अर्धा तास द्या” हरिभाऊ राठोडांची शिंदे-फडणवीसांना विनंती

ओबीसी आरक्षणावर सरकारचा दरोडा

मी सांगत होतो की तुम्ही कर्पुरी ठाकूर फॉर्म्युला लागू करा. एबीसीडी करा. त्यांना वेगळं आरक्षण द्या. परंतु, या गोष्टी कुणीच लक्षात घेतल्या नाहीत. आता तरी ओबीसींनी समजून घ्यावं की सरकारने ओबीसींच्या आरक्षणावर एक प्रकारे दरोडाच टाकला आहे. सरकार एनकेनप्रकारे त्यांच्या पाठीशी आहे. मराठा समाजाचं ओबीसीकरण करणं हीच सरकारची इच्छाशक्ती होती. त्यांनी ती पूर्ण केली. हे सरकार मागासर्गीयांच्या बाजूने उभे नाही. त्यामुळे राज्य सरकारने घेतलेल्या या निर्णयाचा मी निषेध करतो असे हरिभाऊ राठोड यांनी सांगितले.

भुजबळांची नाराजी दूर होईल 

राज्य सरकारच्या निर्णयावर मंत्री छगन भुजबळ देखील नाराज आहेत. भुजबळांच्या या नाराजीसंबंधी पत्रकारांनी आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना विचारले असता शिंदे म्हणाले, आम्ही त्यांच्याशी बोलू. मुख्यमंत्री देखील त्यांच्याशी बोलतील. आपण जो काही निर्णय घेतला आहे त्याची जी काही वस्तुस्थिती आहे ती त्यांना समजावून सांगू. यानंतर सरकारने घेतलेला निर्णय त्याची माहिती आणि वस्तुस्थिती समजून घेतल्यानंतर भुजबळांची नाराजी दूर होईल.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube