मोठी बातमी! जीआरच्या विरोधात ओबीसींमध्ये संतापाची लाट; लक्ष्मण हाके यांनी GR फाडला

  • Written By: Published:
मोठी बातमी! जीआरच्या विरोधात ओबीसींमध्ये संतापाची लाट; लक्ष्मण हाके यांनी GR फाडला

Maratha vs OBC : मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणाबाबतच्या 8 पैकी 6 मागण्या या राज्य सरकारने जवळपास मान्य केल्या आहेत. त्यामुळे मनोज जरांगे यांनी काल उपोषण मागे घेतलं. (OBC) हैदराबाद गॅझेटियरनुसार कुणबी नोंदी असलेल्यांना कुणबी जात प्रमाणपत्र देण्यास सरकारने मान्य केलं आहे. यामुळे मराठवाड्यातील मराठा समाजाला मोठा दिलासा मिळणार आहे.

राज्य सरकारने काल लगेच याबाबतचा जीआर काढला होता. पण राज्य सरकारच्या या निर्णयावर ओबीसी नेते नाराज झाले आहेत. राज्यभरात ओबीसी समाजाच्या नेत्यांनी सरकारच्या निर्णया विरोधात रोष व्यक्त केला आहे. राज्यभरात समता परिषद आणि ओबीसी संघटना या आज रस्त्यावर उतरली. त्यांनी सरकारच्या निर्णयाचा विरोध केला.

मोठी बातमी! मनोज जरांगेंच्या मागण्या मान्य होताच ओबीसीआक्रमक; सरकारने घेतला मोठा निर्णय

काहींनी मराठा आरक्षणाच्या जीआरची होळी केली. गोंदिया, बीड, जालना, नांदेड या जिल्ह्यांमध्ये ओबीसी संघटनांनी आक्रमक आंदोलन केलं. ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी तर मराठा आरक्षणाचा जीआर फाडला आहे. आम्ही महात्मा जोतिबा फुले आणि सावित्रीमाईंच्या ऊर्जास्थळावर आलेलो आहोत. या महाराष्ट्रातल्या राजकारण्यांनी ज्या महात्मा जोतिराव फुले, राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महामानवांचं नाव घेऊन प्रत्येक निवडणुकीला सामोरं जातात.

समतेचं पुरोगामी तत्व सांगितलं. त्याच सर्वपक्षीय पुढाऱ्यांनी, ज्यांच्यावर आमच्या हक्कांचं संरक्षण करण्याची जबाबदारी आहे त्या सगळ्यांनी आमचं आरक्षण संपवणारा जीआर काढला आहे. तो जीआर आम्ही या ऊर्जास्थळावर जाहीरपणे फाडत आहोत. शासनाचा निषेध व्यक्त करत आहोत”, असं म्हणत लक्ष्मण हाके यांनी मराठा आरक्षणाचा जीआर फाडून टाकला. दुसरीकडे राज्य सरकारने मराठा आरक्षणाबाबत घेतलेल्या निर्णयावरुन मंत्री छगन भुजबळ नाराज असल्याची माहिती आहे.

छगन भुजबळ यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीपूर्वी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पार पडलेल्या बैठकीला हजेरी लावली. पण त्यांनी मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार टाकला. याशिवाय मराठा आरक्षणाच्या जीआर विरोधात कोर्टात जाणार असल्याच्या तयारीत देखील असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आगामी काळात याबाबतच्या घडामोडी वाढण्याची शक्यता आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube