घडामोडींना वेग! मंत्री छगन भुजबळ पुन्हा मैदानात, OBC ची बैठक घेत केली मोठी घोषणा

Chhagan Bhujbal Vs Manoj Jarange Patil : मनोज जरांगे मुंबईत येऊन आझाद मैदानात आमरण उपोषणाला बसले आहेत. सरसकट मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावं अशी त्यांची मागणी आहे. (Jarange) त्यांच्या या मागणीला अनेक आमदार, खासदारांनी पाठिंबा दिला आहे. दरम्यान, आता जरांगे यांच्या या मागणीमुळे ओबीसींमध्ये अस्वस्थता निर्माण झाली असून पहिल्यांदाच मंत्री छगन भुजबळ सक्रिय झाले आहेत. त्यांनी आता मोठा निर्णय घेतला आहे.
जरांगे यांनी यांनी मुंबईत येऊन आंदोलन चालू केले तेव्हापासून ओबीसी नेते लक्ष्मण हाके चांगलेच आक्रमक झाले आहेत. राज्यभरात ओबीसी संघटना उपोषणाला बसण्याच्या तयारीत आहेत. नागपूरमध्ये साखळी उपोषणाला सुरुवातही झाली आहे. तर जालना जिल्ह्यात येत्या 1 सप्टेंबरपासून ओबीसी संघटना आपले उपोषण चालू करणार आहेत.
या सर्व घडामोडींत ओबीसी समाजाची बाजू लावून धरणारे तसेच जरांगे यांच्या मागण्यांचा विरोध करणारे छगन भुजबळ मात्र कुठेच दिसत नव्हते. जरांगे यांचे आंदोलन तीव्र झाल्यामुळे मात्र भुजबळ सक्रिय झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार भुजबळ यांनी राज्यातील ओबीसी नेत्यांची बैठक बोलावली आहे.