शरद पवार अन् जरांगेंची लाईन एकच; हाकेंनी वात पेटवत फोडलं नव्या वादाला तोंड

  • Written By: Published:
शरद पवार अन् जरांगेंची लाईन एकच; हाकेंनी वात पेटवत फोडलं नव्या वादाला तोंड

Laxman Hake On Manoj Jarange & Sharad Pawar : मराठा आरक्षणासाठी आंदोलनाचे हत्यार उपसलेल्या मनोज जरांगेंनी (Manoj Jarange) 13 ऑगस्टपर्यंत उपोषण स्थगित करण्याची घोषणा केली आहे. त्यानंतर आता ओबीसी आंदोलनकर्ते लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांनी शरद पवारांचं नाव घेत नव्या वादाला तोंड फोडलं आहे. जरांगे निवडणूक लढू शकत नाहीत, माझ्याकडून हवं तर लिहून घ्या. तसंच जरांगे आणि शरद पवार यांची लाईन एकच असल्याचंही लक्ष्मण हाकेंनी म्हटले आहे. त्यांच्या या विधानानंतर आता राजकीय वातावरण तापण्याची चिन्ह आहेत.

Laxman Hake : आता आरक्षण वाचवायला फुले-शाहू-आंबेडकर येणार नाहीत

जरांगेंमुळे लेकी बाळींना मान खाली घालण्याची वेळ

आंदोलनादरम्यान जरांगेंनी वापरलेल्या भाषेवरूनही हाकेंनी जरांगे पाटलांवर हल्ला चढवला. ते म्हणाले की, मनोज जरांगेंनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेखाली बसून लेकी बाळींना शरमेने मान खाली घालण्याची वेळ येईल अशी भाषा वापरल्याचे हाके म्हणाले. आई बहिणीवर शिव्या घालाव्यात ही काही निवडणूक लढवण्याची साधनं आहेत का? असा खडा सवालही हाकेंनी जरांगेंना विचारला आहे.

लिहून देतो जरांगे निवडणूक लढवत नाही

ज्या मागण्या मान्य होणार नाहीत अशा मागण्या घेऊन जरांगे आंदोलन करत आहेत. त्यामुळे जरी त्यांनी निवडणूक लढवण्याचे संकेत दिले असले तरीही माझ्याकडून पेपरवर लिहून घ्या की मनोज जरांगे निवडणूक लढणार नाहीत असा ठोस दावा हाकेंनी बोलताना केला.

जरांगेंचं सगळं नाटक खुर्चीसाठीच आता त्यांचा शेवट सुरू झालाय; अजय बारस्करांचा घणाघात

जरांगे आणि शरद पवार यांची लाईन एकच

जरांगेंच्या निवडणूक लढवण्याच्या विधानावर बोलताना हाकेंनी शरद पवारांनाही रिंगणात ओढले. शरद पवार आणि जरांगेंची एकच लाईन असून, मनोज जरांगे निवडणुकीच्या तोंडावर एखाद्या नेत्याचा प्रचार करतील, निवडणूक लढवण्यासाठी त्यांच्याकडे कोणताही विचार नाही आणि मॉडेलही नसल्याचे ते म्हणाले.

सलाईन लावून उपोषण करण्यापेक्षा 40 आमदारांना पाडण्याची तयारी करतो

20 तारखेपासून उपोषणाला बसलेल्या जरांगेंनी आज (दि.24) सकाळी उपोषण मागे घेत असल्याची घोषणा केली. तसेच राज्यसरकार आणि राजकीय नेत्यांना विधानसभेसाठी थेट चॅलेंज दिले. जरांगे म्हणाले की, सलाईन लावून उपोषण करण्यापेक्षा आता मी 40 आमदारांना पाडण्याची तयारी करतो. एक-दोन दिवस उपचार घेऊन राज्याचा दौरा सुरु करणार असल्याचेही जरांगे म्हणाले.

राजकीय पक्ष म्हणून भूमिका घेणार का? प्रकाश आंबेडकरांचा पवार – शिंदेंना थेट सवाल

मी इथे झोपून कशाला वेळ घालू? त्यापेक्षा राज्यात फिरुन सभा, रॅली करता येईल. विधानसभेसाठी तयारी करता येईल. कोणी भेटायला आला नाही म्हणून मला फरक पडत नाही. मी मराठा आहे, जातीवंत मराठा आहे. खानदानी आहे. माझ्या शक्तीच्या बळावर मी आंदोलन करतो. मी न्याय हिसकावून आणतो. सरकारला तोंड दाखवायला जागा नाही, त्यामुळे ते तोंड दाखवत नाहीत, असाही हल्लाबोल जरांगे पाटील यांनी केला.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube