मोठी बातमी : मनोज जरांगे यांच्याविरोधात अटक वॉरंट, नाट्य निर्माता फसवणूक प्रकरण

  • Written By: Published:
मोठी बातमी : मनोज जरांगे यांच्याविरोधात अटक वॉरंट, नाट्य निर्माता फसवणूक प्रकरण

Arrest warrant issue against Manoj Jarange: मराठा आरक्षणासाठी लढाई लढत असलेल्या मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) हे एका फसवणुकीच्या गुन्ह्याच्या प्रकरणात अडचणीत आले आहेत. नाट्य निर्मात्यांची आर्थिक फसवणूक केल्याच्या गुन्ह्यात न्यायालयात हजर न राहिल्याप्रकरणी जरांगे यांच्यासह दोघांना अजामिनपात्र अटकेचे वॉरंट काढण्यात आले आहे. पुणे न्यायालयाने हे वॉरंट काढले आहे.

जनता भूलथांपांना बळी पडणार नाही, विरोधकांचा उद्देश खोटं ‘नॅरेटिव्ह’ सेट करणे, मोहोळांचे प्रत्युतर

नाटकांचे प्रयोग आयोजित करून त्याचे पैसे न दिल्याप्रकरणी जरांगे यांच्यासह अर्जुन प्रसाद जाधव आणि दत्ता बहीर यांच्याविरोधात फसवणूक केल्याप्रकरणी कोथरूड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या प्रकरणात न्यायालयाने जरांगे पाटील यांना दोनदा समन्स बजावले होते. आंदोलनामुळे ते न्यायालयात हजर झाले नव्हते. त्यामुळे न्यायालयाने जरांगे पाटील यांच्यासह अन्य दोन आरोपींविरोधात अजामीनपात्र वॉरंट बजावले आहे.


‘वन्समोअर’ वादावर शिक्षणमंत्र्यांचं अजब स्पष्टीकरण, म्हणाले, मराठीत पर्यायी शब्द नाही


काय आहे प्रकरण ?

मनोज जरांगे, अर्जुन जाधव व दत्ता बहीर यांनी तक्रारदार धनंजय घोरपडे यांच्या ‘शंभूराजे’ या नाटकाचे सहा प्रयोग 2023 मध्ये जालना येथे आयोजित केले होते. प्रत्येक प्रयोगाला पाच लाख याप्रमाणे तीस लाख रुपये घोरपडे यांना देण्याचे आयोजकांनी कबूल केले होते. मात्र, या प्रयोगांचे पूर्ण पैसे घोरपडे यांना देण्यात आलेले नव्हते. त्यामुळे त्यांनी न्यायालयात धाव घेतली आणि या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

मनोज जरांगे उपोषणाला

मराठा समाजाला आरक्षण मिळणे, सगेसोयऱ्यांचा अध्यादेश काढणे, गुन्हा मागे घेणे यासाठी अनेक मागण्यांसाठी जरांगे यांनी अंतरवली सराटीमध्ये 20 जुलैपासून उपोषणाला बसलेले आहे. त्यात जरांगे यांनी हे वॉरंट निघालेले आहे. तर मनोज जरांगे यांच्याविरोधात भाजप नेत्यांनी मोहीम उघडले आहे.आमदार प्रसाद लाड, आमदार सदाभाऊ खोत यांनी जरांगे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. तर आता या गुन्ह्यातील कारवाईमुळे मनोज जरांगे यांच्यासमोर अडचणी वाढणार आहेत. तसेच त्यांच्याविरोधात बोलणाऱ्यांच्या हातात एेते कोलित मिळालेले आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube