जनता भूलथांपांना बळी पडणार नाही, विरोधकांचा उद्देश खोटं ‘नॅरेटिव्ह’ सेट करणे, मोहोळांचे प्रत्युतर
Murlidhar Mohol : अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी आज सलग सातव्यांदा देशाचा अर्थसंकल्प (Budget 2024) सादर केला आहे. आज सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात निर्मला सीतारामन यांनी शेतकऱ्यांसाठी, तरुणांसाठी तसेच महिलांसाठी अनेक योजना जाहीर केले आहे. याच बरोबर या अर्थसंकल्पात केंद्र सरकारकडून बिहार (Bihar) आणि आंध्र प्रदेशसाठी (Andhra Pradesh) मोठी घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे आता महाविकास आघाडीने (MVA) भाजपसह (BJP) राज्य सरकारवर जोरदार हल्लबोल करण्यात येत आहे.
या अर्थसंकल्पात केंद्र सरकारने महाराष्ट्राला काहीच दिला नसल्याचा आरोप विरोधकांकडून होत आहे. यातच आता विरोधकांना केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांनी उत्तर देत महाराष्ट्रासाठीही अर्थसंकल्पात भरीव तरतूद करण्यात आली मात्र विरोधक खोटा नॅरेटिव्ह सेट करून जनतेची दिशाभूल करत असल्याचा आरोप केला आहे.
आज माध्यमांशी बोलताना केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ म्हणाले की, 2024-25 साठी अर्थसंकल्प सादर करत असताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दोन राज्यांचा उल्लेख केला मात्र याचा अर्थ असा नाही की इतर राज्यांना काहीच मिळाला नाही. या अर्थसंकल्पात केंद्र सरकारकडून महाराष्ट्रासाठी देखील भरीव तरतूद करण्यात आली आहे. मात्र तरीही देखील विरोधक या अर्थसंकल्पात महाराष्ट्राला काही मिळाले नाही असा खोटा नॅरेटिव्ह सेट करत आहे. पण जनता आता या भूलथांपांना बळी पडणार नाही असं माध्यमांशी बोलताना केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ म्हणाले.
पुढे बोलताना मोहोळ म्हणाले, या अर्थसंकल्पात केंद्राकडून पुण्यासह राज्याला भरगोस निधी मिळाला आहे. तसेच विदर्भ-मराठवाड्यातील सिंचन प्रकल्प, ग्रामीण रस्ते सुधार, इकॅानॉमिक कॉरिडॉर, पर्यावरण कृषी प्रकल्प या अर्थसंकल्पात राज्याला मिळाले आहे. याच बरोबर मुंबई अर्बन ट्रान्सपोर्ट प्रोजेक्ट, मुंबई-पुणे, नागपूर मेट्रो, दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर, एमएमआर ग्रीन मोबॅलिटी, पुणे आणि नागपूर नद्यांसाठी तरतूद अशा विविध बाबी महाराष्ट्राला मिळाल्या असल्याची माहिती देखील त्यांनी यावेळी दिली.
भजन म्हणत असताना मंचावर कोसळून निरुपणकार गोपाळकृष्ण महाराज यांचं निधन
तसेच मोदी सरकारकडून गेल्या दहा वर्षात राज्याला 10 लाख 05 हजार रुपयांचा निधी मिळाला असून यंदाच्या रेल्वेच्या अर्थसंकल्पातून राज्याला 15 हजार 500 कोटी मिळणार आहे. राज्याच्या वाट्याला येणारा निधी कॉंग्रेस सरकारच्या 13 पट अधिक आहे. असं देखील यावेळी मुरलीधर मोहोळ म्हणाले.