मायक्रोसॉफ्टचा सर्व्हर क्रॅश, विमानसेवा ठप्प; मुरलीधर मोहोळ झाले अॅक्टिव्ह

मायक्रोसॉफ्टचा सर्व्हर क्रॅश, विमानसेवा ठप्प; मुरलीधर मोहोळ झाले अॅक्टिव्ह

Muralidhar Mohol : जगातील सर्वात मोठी संगणक कंपनी मायक्रोसॉफ्टच्या (Microsoft’s) यंत्रणेत बिघाड झाल्याने युजर्सना अडचणींचा सामना करावा लागत आहे. मायक्रोसॉफ्टच्या सर्व्हरमधील तांत्रिक बिघाडामुळं जगभरातील बॅंका, आयटी, मीडिया आणि विमान वाहतूकीपर्यंतच्या सेवा ठप्प झाल्यात. अनेक विमानांची उड्डाण रखडली आहे. दरम्यान, यावर आता केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ (Muralidhar Mohol) यांनी यावर प्रतिक्रिया दिली.

BSNL मध्ये नेटवर्क पोर्टिंग करणार असाल तर ‘या’ पद्धतीने जाणून घ्या तुमच्या शहरात नेटवर्क आहे की नाही?

मुरलीधर मोहोळ यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोललांना ते म्हणाले की, मायक्रोसॉफ्टच्या क्लाउड सर्विस डाऊन झाल्यामुळे देशातच नव्हे तर जगभरातील सगळ्याच सेक्टरला फटका बसलेला आहे. डीजीसीए आणि इतर यंत्रणा यावर काम करत आहेत. इंडिगो आणि काही विमानसेवांमध्ये अडचणी येत आहेत. पण प्रवाश्यांना योग्य ती सुविधा पुरवण्यात यावी, यासाठी सूचना देण्यात आलेल्या आहेत. नवीन बुकिंग होत नाहीयेत, काही अडचणी येत आहेत, असं मोहोळ म्हणाले.

चार तासांची बैठक, CM शिंदेंच्या ‘त्या’ सूचनेने आमदारांचं टेन्शन वाढलंच 

सायबर हल्ल्याचा प्रयत्न आहे का? असं विचारलं असता ते म्हणाले, सायबर हल्ल्याविषयी अद्याप काही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. पण आमच्या यंत्रणा यावर काम करत आहेत, असं मोहोळ म्हणाले.

NIC नेटवर्क प्रभावित नाही – अश्विनी वैष्णव

केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की, सीईआरटी म्हणजेच इंडियन कॉम्प्युटर इमर्जन्सी नेटवर्कला या सर्व्हर संकटाचा फटका बसला नाही, असं वैष्णव म्हणाले.

या सेवांवर झाला परिणाम…
जगभरातील एअरलाइन्स, टीव्ही ब्रॉडकास्टिंग, बँकिंग आणि अनेक कॉर्पोरेट कंपन्यांचे कामकाजावर या सर्व्हर संकटाचा परिणाम झाला. अमेरिका, ब्रिटन आणि भारतासारख्या अनेक देशात 1400 उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. या तांत्रिक समस्येमुळे भारतात, इंडिगो, स्पाइसजेट, आकासा एअर, विस्तारा आणि एअर इंडिया एक्स्प्रेस या पाच एअरलाइन्सच्या बुकिंग, चेक-इन आणि फ्लाइट अपडेट सेवांवर परिणाम झाला.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube