BSNL मध्ये नेटवर्क पोर्टिंग करणार असाल तर ‘या’ पद्धतीने जाणून घ्या तुमच्या शहरात नेटवर्क आहे की नाही?

BSNL मध्ये नेटवर्क पोर्टिंग करणार असाल तर ‘या’ पद्धतीने जाणून घ्या तुमच्या शहरात नेटवर्क आहे की नाही?

BSNL Network : गेल्या काही दिवसांपासून देशात अनेक मोबाईल यूजर्स बीएसएनएलमध्ये (BSNL) आपला नेटवर्क पोर्ट करताना दिसत आहे. याचा मुख्य करणार म्हणजे जिओ (Jio),एअरटेल (Airtel) आणि व्हीआय (Vi) या टेलिकॉम कंपन्यांनी आपल्या रिचार्ज प्लॅनमध्ये मोठी वाढ केल्याने अनेक यूजर्सनी बीएसएनएलमध्ये आपला नेटवर्क पोर्ट केला आहे.

जर तुम्ही देखील तुमचा मोबाईल नेटवर्क आता बीएसएनएलमध्ये बदलण्याचा विचार करत असाल किंवा बीएसएनएलचा नवीन सिम घ्याची तयारी करत असाल तर त्यापूर्वी जाणून घ्या तुमच्या शहरात आणि परिसरात बीएसएनएल नेटवर्क आहे की नाही.

माहितीनुसार, जिओ,एअरटेल आणि व्हीआय पेक्षा स्वस्त रिचार्ज प्लॅन ग्राहकांना बीएसएनएल देत आहे. त्यामुळे आता अनेक यूजर्स बीएसएनएलमध्ये नेटवर्क पोर्ट करत आहे. मात्र अनेकजण बीएसएनएलचा नेटवर्क फास्ट नसल्याने बीएसएनएलमध्ये नेटवर्क पोर्ट करण्याचा विचार टाळत आहे. मात्र आता तुम्ही सहज तुमच्या शहरात किंवा परिसरात बीएसएनएलचा नेटवर्क आहे की नाही हे तपासू शकतात.

बीएसएनएलने आपल्या ग्राहकांना स्वतः नेटवर्क तपासण्यासाठी काही सोप्या टिप्स दिले आहे. ज्याच्या मदतीने तुम्ही सहज तुमच्या शहर आणि परिसरातील नेटवर्क माहिती एका मिनिटात मिळवू शकता.

बीएसएनएल सेल्फ सर्व्हिस

बीएसएनएल सेल्फ सर्व्हिस पोर्टलच्या मदतीने तुम्ही नेटवर्क तपासू शकतात. यासाठी तुम्हाला बीएसएनएलच्या सेल्फ-सर्व्हिस पोर्टल https://selfcare.bsnl.co.in/ ला भेट द्यावी लागेल.

यानंतर तुम्हाला नेटवर्क कव्हरेजच्या पर्यायावर क्लिक करावे लागेल.

यानंतर तुम्हाला तुमच्या शहराचा पिन कोड टाकावा लागेल.

पिन कोड टाकल्यानंतर तुम्हाला सबमिट करावा लागेल आणि त्यानंतर तुम्हाला डिस्प्लेमध्ये बीएसएनएलचे नेटवर्क कव्हरेज दिसेल.

माय बीएसएनएल ॲपच्या मदतीने

तुमच्या स्मार्टफोनमध्ये My BSNL ॲप डाउनलोड करा.

ॲपमधील “नेटवर्क कव्हरेज” पर्याय निवडा.

तुमच्या शहराचा पिन कोड एंटर करा आणि “चेक कव्हरेज” हा पर्याय निवडा.

आता तुम्हाला तुमच्या शहराचे आणि तुमच्या क्षेत्राचे BSNL नेटवर्क दिसेल.

बीएसएनएल कस्टमर केअरची मदत घ्या

तुम्ही बीएसएनएल नेटवर्क कस्टमर केअरच्या मदतीने देखील तपासू शकतात.

यासाठी तुम्हाला 1800-180-1500 करून सर्व माहिती प्राप्त करू शकता.

FIFA Rankings मध्ये भारताला धक्का, क्रमवारीत घसरण, जाणून घ्या ‘नंबर एक’ कोण? 

बीएसएनएल स्टोअरला भेट

याशिवाय तुम्ही बीएसएनएल नेटवर्क आणि तुमच्या शहर आणि परिसरातील सुविधांबद्दल माहिती प्राप्त करण्यासाठी बीएसएनएल स्टोअरला भेट देऊ शकता.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube