एअरटेलची एलन मस्कच्या कंपनीसोबत हातमिळवणी! शेअर्सच्या किमतीत वाढ, गुंतवणूक करण्याची योग्य वेळ?

Airtel Announces Agreement With Elon Musk Starlink Satellite : भारतात इंटरनेट कनेक्टिव्हिटीला नवीन उंचीवर नेण्यासाठी एअरटेल (Airtel) कंपनीने आणि एलन मस्कची (Elon Musk) कंपनी स्पेसएक्स सोबत हातमिळवणी केलीय. आज एका नियामक फाइलिंगमध्ये एअरटेलने या कराराची माहिती दिली. या करारांतर्गत, स्पेसएक्सची स्टारलिंक (Starlink Satellite) उपग्रह इंटरनेट सेवा भारतात सुरू केली जाणार आहे, हा करार अद्याप भारत सरकारच्या मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे.
यामागे नेमका उद्देश काय?
एअरटेल आणि स्टारलिंक एकत्रितपणे भारतात इंटरनेट कनेक्टिव्हिटी वाढवण्याचे मार्ग शोधतील. याव्यतिरिक्त, एअरटेल त्यांच्या रिटेल स्टोअरमध्ये स्टारलिंक उपकरणे विकू शकते. व्यवसायांना हाय-स्पीड सॅटेलाइट इंटरनेट प्रदान करू शकते. दोन्ही कंपन्या ग्रामीण शाळा, आरोग्य केंद्रे आणि दुर्गम भागात इंटरनेट पुरवण्यासाठी एकत्र काम करतील. स्टारलिंकच्या उपग्रह तंत्रज्ञानामुळे एअरटेलचं नेटवर्क आणखी मजबूत होईल, तर स्पेसएक्स एअरटेलच्या जमिनीवरील पायाभूत सुविधांचा वापर करू शकेल, यामुळे दोघांनाही फायदा होणार आहे.
– एअरटेल कंपनीने आणि एलोन मस्कची कंपनी स्पेसएक्स सोबत हातमिळवणी केलीय.
– ही डील इंटरनेट सेवा आणि कनेक्टिव्हीटी संदर्भात आहे.
– स्पेसएक्सची स्टारलिंक सर्व्हिस आता भारतात एअरटेल सोबत काम करणार आहे.
– यानंतर लगेच एअरटेलच्या शेअर्समध्ये तेजी दिसून आलीय.
– स्टॉक्स एक्सपर्ट म्हणतात की, एअरटेलमध्ये गुंतवणूक करण्याची ही योग्य संधी आहे.
– या डीलमुळे रिमोट एरियामध्ये हायस्पीड इंटरनेट सेवा मिळू शकते.
– एअरटेलची 5जी सर्व्हिस अजून मजबूत होवू शकते.
– स्टारलिंकमुळे एअरटेल विरूद्ध जिओ अशी स्पर्धा देखील निर्माण होवू शकते.
– एक्सपर्ट्सच्या मते एअरटेल टार्गेटची किंमत, 950 ते 1000 होवू शकते.
एअरटेलचा मोठा निर्णय
एअरटेलने सॅटेलाइट ब्रॉडबँडसाठी युटेलसॅट वनवेबसोबत आधीच भागीदारी केलीय. स्टारलिंकसोबतच्या या नवीन करारामुळे एअरटेलचे कव्हरेज आणखी वाढेल, विशेषतः ज्या भागात इंटरनेटची सुविधा नाही, अशा भागात कव्हरेज आणखी वाढलेलं दिसेल. यामुळे दुर्गम भागातील व्यवसाय आणि समुदायांना हाय-स्पीड ब्रॉडबँड उपलब्ध होईल, यामुळे विकासाच्या नवीन संधी उपलब्ध होतील.
लाडक्या बहिणींच्या 2100 वरून राडा; रक्कम कधी देणार विचारताच तटकरेंचं फडणवीसांकडे बोट
एअरटेलने काय म्हटलंय?
पीटीआयशी बोलताना एअरटेलचे व्यवस्थापकीय संचालक आणि उपाध्यक्ष गोपाल विठ्ठल म्हणाले की, भारतातील एअरटेल ग्राहकांना स्टारलिंक सेवा प्रदान करण्यासाठी स्पेसएक्ससोबत काम करणे, हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. पुढील पिढीच्या उपग्रह कनेक्टिव्हिटीसाठी कंपनीची वचनबद्धता दर्शवते. या भागीदारीमुळे आम्हाला भारतातील सर्वात दुर्गम भागातही हाय-स्पीड ब्रॉडबँड पोहोचवण्याची क्षमता मिळेल. स्टारलिंक एअरटेलच्या उत्पादनांमध्ये आणखी वाढ करेल, जेणेकरून प्रत्येक भारतीयाला परवडणारे आणि विश्वासार्ह इंटरनेट मिळेल.
स्पेसएक्सने काय म्हटलंय?
स्पेसएक्सचे अध्यक्ष ग्वाइन शॉटवेल म्हणाले की, स्टारलिंकचा प्रभाव भारतातील लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी एअरटेलसोबत काम करण्यास आम्ही उत्सुक आहोत. एअरटेल टीमने भारताच्या दूरसंचार क्षेत्रात महत्त्वाची भूमिका बजावली आहे, त्यामुळे त्यांच्यासोबत काम करणे हे आमच्यासाठी योग्य पाऊल आहे.
‘आम्ही मैदानात कुठेही नसणार…’ महाराष्ट्र केसरीवर रोहित पवार स्पष्टचं बोलले, सगळंच सांगितलं
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि एलन मस्क यांच्यात झालेल्या अलिकडच्या बैठकीनंतर काही आठवड्यांनी हा करार झाला आहे. मोदींनी त्यांच्या अमेरिका भेटीदरम्यान मस्क यांची भेट घेतली होती. यामध्ये नवोन्मेष, अवकाश संशोधन, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि शाश्वत विकास या क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढवण्याबाबत चर्चा झाली.
एलोन मस्कला स्टारलिंक भारतात आणण्याची खूप दिवसांपासून इच्छा होती, परंतु नियामक आव्हाने आणि रिलायन्स जिओसारख्या देशांतर्गत दूरसंचार कंपन्यांच्या विरोधामुळे प्रगती मंदावली आहे. नोव्हेंबर 2022 मध्ये, भारताचे दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी सांगितलं होतं की, स्टारलिंकने सुरक्षा नियमांचे पालन केले नाही. त्यामुळे त्यांचा उपग्रह संप्रेषण परवाना राखून ठेवला. भारत ही एक मोठी बाजारपेठ आहे, जिथे 1.4 अब्ज लोकसंख्येपैकी 40 टक्के लोक अजूनही इंटरनेटपासून वंचित आहेत.
एअरटेलनंतर आता जिओ प्लॅटफॉर्म्स लिमिटेड (जेपीएल) ने भारतातील ग्राहकांना स्टारलिंक ब्रॉडबँड इंटरनेट सेवा प्रदान करण्यासाठी एलोन मस्कची कंपनी स्पेसएक्स सोबत करार केला आहे.
या कराराद्वारे, दोन्ही पक्ष डेटा ट्रॅफिकच्या बाबतीत जिओचे ‘जगातील सर्वात मोठे मोबाइल ऑपरेटर’ म्हणून असलेले स्थान आणि स्टारलिंकचे ‘जगातील आघाडीचे लो अर्थ ऑर्बिट सॅटेलाइट कॉन्स्टेलेशन ऑपरेटर’ म्हणून असलेले स्थान यांचा फायदा घेणार आहेत. ते भारतातील ग्रामीण आणि दुर्गम भागांसह देशभरात विश्वसनीय ब्रॉडबँड सेवा प्रदान करतील. जिओ त्यांच्या रिटेल आउटलेटवर स्टारलिंक उपकरणेच पुरवणार नाही, तर ग्राहक सेवा स्थापनेसाठी आणि सक्रियतेसाठी एक यंत्रणा देखील स्थापित करेल. स्पेसएक्ससोबतचा करार हा भारतातील सर्व उद्योग, लघु आणि मध्यम व्यवसाय आणि समुदायांना विश्वसनीय इंटरनेट पूर्णपणे उपलब्ध व्हावे, यासाठी जिओच्या वचनबद्धतेचा एक भाग आहे. स्टारलिंक जलद आणि परवडणाऱ्या मार्गाने सर्व ठिकाणी हाय-स्पीड इंटरनेटचा विस्तार करेल.