‘त्या’ 10 हजार कोटींच्या घोटाळ्यात शिंदे कुटुंबाचा हात? सावंतांची चौकशी करा, आदित्य ठाकरेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Aditya Thackeray demands Tanaji Sawant Investigation Ambulance scam : राज्यात विधानसभेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. दरम्यान ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे ( Aditya Thackeray) यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्याकडे एक मोठी मागणी केलीय. आदित्य ठाकरे म्हणाले की, रूग्णवाहिकेचा घोटाळा दहा हजार कोटींचा होता. या घोटाळ्याची (Ambulance scam) चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी केलीय.
माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कुटुंबातील कोणाचा हात यामध्ये आहे का? मंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांच्यावर चौकशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी करावी, अशी मागणी देखील आदित्य ठाकरेंनी केलीय. 108 नंबर दाबल्यास आजही रूग्णवाहिका येत नाही, असा दावा देखील आदित्य ठाकरेंनी केलीय.
कम फॉल इन लव – डीडीएलजे म्यूजिकल। जेना पंड्या आणि अॅशली डे यांचा होळीच्या रंगात नवा अंदाज
शेतकरी कर्जमाफी आम्ही केली होती. सर्वाधिक निधी कोणाला मिळाला, हे पहावं लागेल. लाडकी बहीण आणि शेतकरी कर्ज माफी अशा घोषणा केल्या, पण काहीच नाही. लाडकी बहीण योजनेतील महिला कमी होत (Maharashtra Politics) आहेत. सरकारच्या जाहीरनाम्यातील 10 आश्वासन पूर्ण झालेली नाहीत. वरुण सरदेसाई यांनी भाषणात मुद्दा उपस्थित केला, असं देखील आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केलंय.
पीओपीमुळे मुंबईत प्रदुषण होत नाही, याबाबत समिती कधी गठीत होणार आहे? याचा खुलासा करावा, अशी मागणी देखील आदित्य ठाकरे यांनी केलीय. पीओपीच्या गणेश मूर्ती दोन ते तीन महिने अगोदर बनतात. त्यामुळे त्यांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे, असं देखील आदित्य ठाकरे म्हणाले आहेत.
… तर सुरेश धस 75 हजारांच्या लीडने निवडून आले असते का? पंकजा मुंडेंचा सवाल
रूग्णवाहिका घोटाळ्यामध्ये आदित्य ठाकरे यांनी शिंदे कुटुंबाचं नाव घेतल्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. आता याप्रकरणी मुख्यमंत्री काय भूमिका घेतात, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.