चार तासांची बैठक, CM शिंदेंच्या ‘त्या’ सूचनेने आमदारांचं टेन्शन वाढलंच
Eknath Shinde on Maharashta Assembly Elections : राज्यात आता विधानसभा निवडणुकीचे वारे जोरात वाहू लागले आहेत. महायुती आणि महाविकास आघाडीने तयारी सुरू केली आहे. लोकसभा निवडणुकीत चांगले यश मिळाल्यानंतर महाविकास आघाडी जोमात आहे. तर महायुती मात्र सावध पावले टाकत आहे. जागावाटपाच्या चर्चा सुरू झाल्या तशा महायुतीत खटके उडण्यास सुरुवात झाली आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपने जशी मनमानी केली तशीच मनमानी आताही केली जाणार का, असा प्रश्न शिंदे गटाच्या मनात घर करून राहिलेला असतानाच खुद्द मुख्यमंत्री शिंदेंनीच आमदारांना काळजीत टाकलं आहे.
मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीनंतर आमदार आणि पदाधिकारी काळजीत पडले आहेत. सीएम शिंदेंनी स्पष्ट शब्दांत सांगितलं आहे की जागावाटपात जागांची अदलाबदल झाली तर मनाची तयारी ठेवा. आपापल्या मतदारसंघांवर लक्ष ठेवा. महायुतीत बेबनाव होणार नाही याचीही काळजी घ्या असे आवाहन शिंदेंनी केले. शिंदेंच्या या सूचनांमुळे आमदारांचं टेन्शन वाढलं आहे.
एकनाथ शिंदे अन् अजितदादांना पाच मतदारसंघात अवघड पेपर.. विजयासाठी घाम गाळावा लागणार!
आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीत जागावाटपाचा फॉर्म्युला अजून निश्चित झालेला नाही. उमेदवार आणि मतदारसंघांची चाचपणी केली जात आहे. कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार याबाबत अजून काहीच निश्चित नाही. मात्र तरी देखील घटक पक्षांनी जागांचा आकडा सांगण्यास सुरुवात केली आहे. एकनाथ शिंदे यांनीही या बैठकीत 110 जागांवर लढण्याची तयारी सुरू केल्याचे सांगितले. यासाठी 110 निरीक्षकही नेमले आहेत. शिवसेनेला जास्तीत जास्त जागा मिळाव्यात यासाठी दिल्लीश्वरांकडे मागणी करणार असल्याचे शिंदेंनी स्पष्ट केले.
लोकसभेच्या इतिहासाने आमदार धास्तावले
दरम्यान, याआधी लोकसभा निवडणुकीत काही मतदारसंघात शिंदे गटाचे उमेदवार बदलले होते. यामागे भाजपाचा दबाव असल्याची चर्चा होती. हिंगोलीत हेमंत पाटील यांना जाहीर केलेली उमेदवारी बदलावी लागली होती. नाशिक मतदारसंघातील उमेदवारीवरूनही प्रचंड ओढाताण झाली होती. अखेर शिंदे गटाने ही जागा स्वतः कडेच ठेवत हेमंत गोडसेंना उमेदवारी दिली. मात्र गोडसे पराभूत झाले. अशाच पद्धतीने वाशिम यवतमाळच्या माजी खासदार भावना गवळी यांचे तिकीट कापण्यात आले. कृपाल तुमाने यांनाही तिकीट नाकारण्यात आले. आणखीही काही मतदारसंघात अदलाबदल करण्यात आली.
आता अशीच परिस्थिती विधानसभा निवडणुकीत तयार होईल असे संकेत एकनाथ शिंदे यांच्या सूचनेतून मिळाले आहेत. त्यामुळे शिंदे गटाच्या आमदार आणि पदाधिकाऱ्यांत खळबळ उडाली आहे. तिकीट मिळण्यासाठी तयारी केली जात असतानाच आता मतदारसंघाची अदलाबदल झाली तर नव्या मतदारसंघातून विजय कसा मिळणार असा प्रश्न शिंदे गटाच्या आमदार आणि इच्छुक उमेदवारांना सतावू लागला आहे.
मुकेश अंबानींनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट; मुलाच्या लग्नाचं दिलं आमंत्रण