‘लव्ह अँड वॉर’ आंतरराष्ट्रीय स्तरावर नेणार, क्लायमॅक्स शूटसाठी भन्साळी पोहचले इटलीमध्ये

‘Love and War’ to be taken to international level, Bhansali reaches Italy for climax shoot : दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांची आगामी भव्य फिल्म लव्ह अँड वॉर ही जाहीर झाल्यापासूनच चर्चेत आहे. या चित्रपटात रणबीर कपूर, आलिया भट्ट आणि विकी कौशल यांसारखे ताकदीचे कलाकार एकत्र झळकणार असून, त्यांना मोठ्या पडद्यावर एकत्र पाहण्यासाठी प्रेक्षक प्रचंड उत्सुक आहेत. या चित्रपटाला आंतरराष्ट्रीय स्तरावर घेऊन जाण्याचा संजय लीला भन्साळी यांचा मनसुबा आहे आणि त्यासाठी ते फिल्मच्या क्लायमॅक्सचं शूट इटलीच्या सिसिलीमध्ये करणार आहेत.
महिला क्रिकेट वर्ल्डकपसाठी आयसीसीचा मोठा निर्णय; मिळणार 125 कोटींचं बक्षीस
चित्रपटाचे जवळपास 125 दिवसांचे शूटिंग पूर्ण झाले आहे. अलीकडेच मुंबईतील एका भव्य सेटवर याचे मोठे शेड्यूल शूट करण्यात आले. एका स्वतंत्र इंडस्ट्री स्रोताने दिलेल्या माहितीनुसार, “संजय लीला भन्साळी ‘लव्ह अँड वॉर’ला आंतरराष्ट्रीय स्तरावर घेऊन चालले आहेत. ते चित्रपटाचा क्लायमॅक्स सीन इटलीमधील सिसिली येथे शूट करणार आहेत. हा संपूर्ण शेड्यूल शहरभरात आखण्यात आलेला आहे आणि हे शूट चित्रपटातील सर्वात भव्य आणि महत्त्वाच्या शूट्सपैकी एक असेल.”
मोठी बातमी! जीआरच्या विरोधात ओबीसींमध्ये संतापाची लाट; लक्ष्मण हाके यांनी GR फाडला
चित्रपटाशी संबंधित एका सूत्राने पुढे सांगितले की, ‘लव्ह अँड वॉर’चा क्लायमॅक्स हा कथेला एक जबरदस्त नाट्यमय वळण देईल. यात संजय लीला भन्साळी रणबीर, आलिया आणि विकी यांच्या अभिनयाला एका विशेष पद्धतीने सादर करणार आहेत. त्या सूत्रानं पुढे सांगितलं, “भन्साळींना मोठे आणि नाट्यमय सीन शूट करायला आवडतात, आणि ‘लव्ह अँड वॉर’चा क्लायमॅक्स हा रोमँसच्या पार्श्वभूमीवर आधारित एक नाट्यमय भाग असेल. ते सिसिलीतील वेगवेगळ्या लोकेशन्सवर एक लांब क्लायमॅक्स सीन शूट करणार आहेत. एवढंच नाही, तर या शेड्यूलमध्ये ते या तिघांच्या सहभागाने एक गाणं देखील शूट करणार आहेत. या शेड्यूलदरम्यान भन्साळी जवळपास एक महिना परदेशातच वास्तव्यास असणार आहेत.”
मोठी बातमी! मनोज जरांगेंच्या मागण्या मान्य होताच ओबीसीआक्रमक; सरकारने घेतला मोठा निर्णय
‘लव्ह अँड वॉर’ पाहण्यासाठी प्रेक्षकांची उत्सुकता दिवसेंदिवस वाढत आहे. संजय लीला भन्साळी यांच्या दिग्दर्शनाखाली रणबीर कपूर, आलिया भट्ट आणि विकी कौशल यांचं हे तगडं कॉम्बिनेशन मोठ्या पडद्यावर पाहणं, प्रेक्षकांसाठी एक खास अनुभव ठरणार आहे. विशेष म्हणजे, हा चित्रपट 20 मार्च 2026 रोजी प्रदर्शित होणार आहे.