महिला क्रिकेट वर्ल्डकपसाठी आयसीसीचा मोठा निर्णय; मिळणार 125 कोटींचं बक्षीस

महिला क्रिकेट वर्ल्डकपसाठी आयसीसीचा मोठा निर्णय; मिळणार 125 कोटींचं बक्षीस

Women’s World Cup 2025 Prize Money : महिला क्रिकेट वर्ल्डकप स्पर्धा येत्या 30 सप्टेंबरपासून सुरू (Women’s World Cup 2025) होणार आहे. या स्पर्धेसाठी आयसीसीने नुकताच एक मोठा निर्णय (ICC) घेतला आहे. या स्पर्धेच्या बक्षीसांच्या रकमेत तब्बल 297 टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. आयसीसीचे अध्यक्ष जय शाह यांनी (Jay Shah) महिला विश्वकप स्पर्धेसाठी बक्षिसाची रक्कम वाढवली आहे. महिला क्रिकेटला वेगळ्या पातळीवर घेऊन जाण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे. आता या स्पर्धेत विजेत्या संघाला नेमके किती पैसे मिळणार याची माहिती घेऊ या..

वर्ल्डकपसाठी प्राइज मनी

वर्ल्डकप जिंकणाऱ्या संघाला आयसीसीने 4.48 मिलियन डॉलर्स बक्षीस रकमेची घोषणा केली आहे. भारतीय चलनात ही रक्कम 40 कोटी रुपये इतकी होते. फायनल सामन्यात पराभूत होणाऱ्या टीमला 20 कोटी रुपये मिळतील. सेमीफायनलमध्ये पोहोचणाऱ्या टीमला जवळपास 10 कोटी रुपये बक्षीस म्हणून मिळतील. ग्रुप स्टेजमध्ये सामना जिंकणाऱ्या टीमला 34 हजार डॉलर मिळतील. पाचव्या आणि सहाव्या क्रमांकावर राहणाऱ्या टीमला 6 कोटी रुपये मिळतील. सातव्या आणि आठव्या क्रमांकावरील टीमला अडीच कोटी रुपये बक्षीस म्हणून मिळतील. कुणी सामना जिंकला किंवा नाही जिंकला तरीही प्रत्येक टीमला अडीच कोटी रुपये मिळणार आहेत.

महिला टी 20 वर्ल्डकपबाबत मोठी अपडेट; भारताने नाकारली बांग्लादेशची विनंती

आयसीसी महिला वर्ल्डकप शेड्यूल

30 सप्टेंबर, मंगळवार: भारत vs श्रीलंका
1 ऑक्टोबर, बुधवार: ऑस्ट्रेलिया vs न्यूझीलंड
2 ऑक्टोबर, गुरुवार: बांग्लादेश vs पाकिस्तान
3 ऑक्टोबर, शुक्रवार: इंग्लंड vs दक्षिण आफ्रिका
4 ऑक्टोबर, शनिवार: श्रीलंका vs ऑस्ट्रेलिया
5 ऑक्टोबर, रविवार: भारत vs पाकिस्तान
6 ऑक्टोबर, सोमवार: न्यूझीलंड vs दक्षिण आफ्रिका
7 ऑक्टोबर, मंगळवार: इंग्लंड vs बांग्लादेश
8 ऑक्टोबर, बुधवार: ऑस्ट्रेलिया vs पाकिस्तान
9 ऑक्टोबर, गुरुवार: भारत vs दक्षिण आफ्रिका
10 ऑक्टोबर, शुक्रवार: न्यूझीलंड vs बांग्लादेश
11 ऑक्टोबर, शनिवार: इंग्लंड vs श्रीलंका
12 ऑक्टोबर, रविवार: भारत vs ऑस्ट्रेलिया
13 ऑक्टोबर, सोमवार: दक्षिण आफ्रिका vs बांग्लादेश
14 ऑक्टोबर, मंगळवार: श्रीलंका vs न्यूझीलंड
15 ऑक्टोबर, बुधवार: इंग्लंड vs पाकिस्तान
16 ऑक्टोबर, गुरुवार: ऑस्ट्रेलिया vs बांग्लादेश
17 ऑक्टोबर, शुक्रवार: श्रीलंका vs दक्षिण अफ्रीका
18 ऑक्टोबर, शनिवार: न्यूझीलंड vs पाकिस्तान
19 ऑक्टोबर, रविवार: भारत vs इंग्लंड
20 ऑक्टोबर, सोमवार: श्रीलंका vs बांग्लादेश
21 ऑक्टोबर, मंगळवार: दक्षिण अफ्रीका vs पाकिस्तान
22 ऑक्टोबर, बुधवार: ऑस्ट्रेलिया vs इंग्लंड
23 ऑक्टोबर, गुरुवार: भारत vs न्यूझीलंड
24 ऑक्टोबर, शुक्रवार: श्रीलंका vs पाकिस्तान
25 ऑक्टोबर, शनिवार: ऑस्ट्रेलिया vs दक्षिण अफ्रीका
26 ऑक्टोबर, रविवार: इंग्लंड vs न्यूझीलंड
भारत vs बांग्लादेश
29 ऑक्टोबर, बुधवार: पहिली सेमीफाइनल
30 ऑक्टोबर, गुरुवार: दुसरी सेमीफाइनल
2 नोव्हेंबर, रविवार: टीबीसी vs टीबीसी, फायनल

follow us
  • fb
  • instagram
  • youtube