महिला टी 20 वर्ल्डकपबाबत मोठी अपडेट; भारताने नाकारली बांग्लादेशची विनंती
Women’s T20 World Cup in Bangladesh : बांग्लादेशातील हिंसाचारामुळे (Bangladesh Crisis) या देशात आता महिला टी 20 वर्ल्डकप होण्याची शक्यता मावळत चालली आहे. वर्ल्डकपसाठी आणखी (Women’s T20 World Cup) दोन महिने शिल्लक आहेत. या दोन महिन्यांत येथील परिस्थिती पूर्वपदावर आली नाही तर कदाचित येथे वर्ल्डकप स्पर्धा होणार नाहीत. बांग्लादेश नाही तर मग दुसऱ्या कोणत्या देशात या स्पर्धा घेता येतील याचा विचार आयसीसीने (ICC) सुरू केला आहे. श्रीलंका, भारत आणि युएई हे तीन पर्याय आयसीसीसमोर आहेत. यातील भारतात वर्ल्डकप होण्याची शक्यता कमी आहे. कारण बीसीसीआय (BCCI) या स्पर्धा भारतात आयोजित करू इच्छित नाही. बीसीसीआयचे सचिव जय शाह (Jay Shah) यांनी याबाबतीत स्पष्ट उत्तर दिलं आहे.
जय शाह यांनी टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत याबाबत माहिती दिली. बांग्लादेश क्रिकेट बोर्डाने (Bangladesh Cricket Board) महिला टी 20 वर्ल्डकप भारतात आयोजित करण्याची विनंती केली होती. मात्र आम्ही नकार दिला आहे. पुढील वर्षात महिला वर्ल्डकप भारतात होणार आहे. या स्पर्धेची तयारी सध्या केली जात आहे. याआधी भारतात पुरुषांचा वर्ल्डकप झाला होता. भारत सातत्याने विश्वचषक स्पर्धांचे आयोजन करू शकतो असा संदेश आम्हाला द्यायचा नाही, असे जय शाह म्हणाले.
Bangladesh violence: बांग्लादेशमधील राजकीय अस्थिरता हिंदुंच्या जीवावर; मंदिरांची तोडफोड, जाळपोळ
जर या स्पर्धा बांग्लादेशात झाल्याच नाहीत तर श्रीलंका किंवा युएईत स्पर्धा होऊ शकतात. श्रीलंकेत ऑक्टोबर महिन्यात पाऊस होत असतो. त्यामुळे येथे पावसाचा सामना करावा लागू शकतो. युएई हा पर्याय योग्य ठरू शकतो. श्रीलंकेने याच वर्षात महिला आशिया कप स्पर्धेचे आयोजन केले होते.
भारतात आयसीसीच्या कोणत्याही मोठ्या स्पर्धा कोणत्याही अडचणीविना होऊ शकतात. कारण यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व व्यवस्था उपलब्ध आहेत. असे असतानाही भारतच फक्त सातत्याने मोठ्या स्पर्धा आयोजित करू शकतो असा संदेश देण्याची गरज बीसीसीआयला वाटत नाही. त्यामुळे नियमितपणे स्पर्धा आयोजित करण्याची जबाबदारी बीसीसीआयने नाकारली आहे. महिला टी 20 वर्ल्डकप दुसऱ्या देशात आयोजित करण्याबाबत चर्चा झाली आहे. याबाबत अंतिम निर्णय आगामी संभाव्य घडामोडी आणि स्पर्धा आयोजित करण्यासाठी पर्यायी देशांची तयारी यांवर अवलंबून असणार आहे.
T20 मध्ये अव्वल टीम इंडिया! वर्षभरात फक्त एक पराभव; प्रत्येक सामन्यात नवा ‘हिरो’