BCCI कडून मोठी घोषणा, ‘या’ दिग्गज खेळाडूची टीम इंडियाचा गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून निवड

BCCI कडून मोठी घोषणा, ‘या’ दिग्गज खेळाडूची टीम इंडियाचा गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून निवड

Morne Morkel :  एक मोठी बातमी समोर आली आहे. भारतीय क्रिकेट संघाच्या गोलंदाजी प्रशिक्षकाची घोषणा बीसीसीआयकडून (BCCI) करण्यात आली आहे. बीसीसीआयने मोठा निर्णय घेत आज दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज मॉर्नी मॉर्केलची (Morne Morkel) भारतीय संघाच्या गोलंदाजी प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली असल्याची घोषणा केली आहे.

भारतीय संघाचा नवीन मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरने (Gautam Gambhir) बीसीसीआयकडे मॉर्नी मॉर्केलची या पदावर निवड करण्यात यावी अशी मागणी केली होती. बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेतून मॉर्नी मॉर्केल भारतीय संघात सामील होणार आहे.

बीसीसीआयचे सचिव जय शाह (Jay Shah) यांनी दिलेल्या माहितीनुसार, मॉर्नी मॉर्केलचा करार 1 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. मॉर्ने मॉर्केल याआधी पाकिस्तान क्रिकेट संघाचा गोलंदाजी प्रशिक्षक होता. तर आयपीएलमध्ये गौतम गंभीर आणि मोर्ने मॉर्केल यांनी लखनौ सुपर जायंट्ससाठी एकत्र काम केले आहे आणि त्यांचे दोघांचे संबंधही चांगले असल्याने बीसीसीआयकडे गौतम गंभीरने मॉर्नी मॉर्केलचे नाव सुचवले होते.

अर्शद नदीम करणार पाकिस्तान क्रिकेट संघात एन्ट्री, बांगलादेशविरुद्धच्या मालिकेत दिसणार ॲक्शनमध्ये?

मॉर्केलने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये  86 कसोटीमध्ये 160 डावात 309 विकेट तर  117 एकदिवसीय सामन्यात 188 विकेट  आणि 44 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात मॉर्केलने 47 विकेट्स घेतले आहे.

Byju ला मोठा धक्का, सर्वोच्च न्यायालयाने BCCI सोबत सेटलमेंट ऑर्डरला दिली स्थगिती

follow us
  • fb
  • instagram
  • youtube