अर्शद नदीम करणार पाकिस्तान क्रिकेट संघात एन्ट्री, बांगलादेशविरुद्धच्या मालिकेत दिसणार ॲक्शनमध्ये?
Arshad Nadeem : टी-20 विश्वचषकानंतर पाकिस्तान संघ 21 ऑगस्टपासून बांगलादेश विरुद्ध 2 कसोटी (Pak Vs Ban) सामन्यांची मालिका खेळणार आहे. या मालिकेसाठी पाकिस्तान (Pakistan) संघाची घोषणा देखील करण्यात आली आहे. मात्र एक मोठी बातमी समोर आली आहे. या बातमीनुसार पॅरिस ऑलिम्पिकमध्ये (Paris Olympic 2024) पुरुषांच्या भालाफेक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारा अर्शद नदीम (Arshad Nadeem) पाकिस्तान संघात एंट्री करू शकतो.
माहितीनुसार, अर्शद नदीम या मालिकेदरम्यान पाकिस्तान क्रिकेट संघाच्या ड्रेसिंग रूममध्ये दिसू शकतो. पाकिस्तान संघात सामील होण्यासाठी अर्शद नदीमला आमंत्रित करण्यात आले असल्याची माहिती समोर आली आहे. जर त्याने हा प्रस्ताव स्वीकारला तर तो देखील बांगलादेशविरुद्ध होणाऱ्या 2 कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी पाकिस्तानच्या संघात दिसू शकतो.
पाकिस्तान क्रिकेट संघात अर्शद नदीमची भूमिका काय असेल?
अर्शद नदीम भालाफेकपटू होण्यापूर्वी क्रिकेट खेळत होता. त्यामुळे जर त्यांची पाकिस्तान क्रिकेट संघात निवड झाली तर तो कोणती भूमिका पार पडणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. सध्या समोर आलेल्या माहितीनुसार, अर्शद नदीम पाकिस्तान संघात खेळाडू म्हणून सामील होणार नाही. तो पाकिस्तान संघाचा उत्साह आणि आत्मविश्वास वाढवण्याचे काम करणार असल्याची माहिती समोर आली आहे.
कोणी दिला अर्शद नदीमला संघात सामील होण्याचा प्रस्ताव ?
पाकिस्तान संघाच्या वतीने बांगलादेश विरुद्ध होणाऱ्या मालिकेसाठी पाकिस्तान संघाचे प्रशिक्षक जेसन गिलेस्पी यांनी अर्शद नदीमला संघात सामील होण्याचा प्रस्ताव दिला आहे. यावेळी गिलेस्पीने सांगितले की, आमच्या ड्रेसिंग रूममध्ये अर्शद नदीमला बोलावायचे आहे. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सर्व क्रिकेटपटूंनी त्याला प्रोत्साहन दिले होते. त्यामुळे ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकणारा नदीम पाकिस्तानच्या ड्रेसिंग रुमचा भाग बनला तर यापेक्षा चांगले काही होणार नाही. असं गिलेस्पी म्हणाला.
पुढे बोलताना गिलेस्पी म्हणाला, ड्रेसिंग रूममध्ये अर्शद नदीम बाबर आझम आणि मोहम्मद रिझवानसारख्या खेळाडूंसोबत चर्चा करू शकतो. ज्यामुळे आमच्या खेळाडूंचा आत्मविश्वास वाढेल.
Byju ला मोठा धक्का, सर्वोच्च न्यायालयाने BCCI सोबत सेटलमेंट ऑर्डरला दिली स्थगिती
तर दुसरीकडे पाकिस्तान कसोटी संघाचा कर्णधार शान मसूदनेही अर्शद नदीमचे कौतुक करत त्याचे यश आम्हाला चांगली कामगिरी करण्यासाठी प्रेरणा देईल. रिस ऑलिम्पिकमध्ये पुरुषांच्या भालाफेक स्पर्धेत अर्शद नदीमने 92.97 मीटर भालाफेक करून सुवर्णपदक जिंकले होते.