Byju ला मोठा धक्का, सर्वोच्च न्यायालयाने BCCI सोबत सेटलमेंट ऑर्डरला दिली स्थगिती

Byju ला मोठा धक्का, सर्वोच्च न्यायालयाने BCCI सोबत सेटलमेंट ऑर्डरला दिली स्थगिती

Byju Case : सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) एज्युटेक कंपनी बायजूला (Byju) मोठा धक्का दिला आहे. आधीच आर्थिक अडचणीत असणाऱ्या बायजूला  सर्वोच्च न्यायालयाने मोठा धक्का देत दिवाळखोरी अपीलीय न्यायाधिकरणाच्या आदेशाला स्थगिती दिली आहे. दिवाळखोरी अपीलीय न्यायाधिकरणाने बीसीसीआयकडे (BCCI) असलेल्या बायजूच्या 158.9 कोटी रुपयांच्या थकबाकीच्या सेटलमेंटला मान्यता दिली होती मात्र आता सर्वोच्च न्यायालयाने या निर्णयाला स्थगिती दिली आहे.

सुनावणी दरम्यान सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड, न्यायमूर्ती जेबी पार्डीवाला आणि न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांच्या खंडपीठाने नॅशनल कंपनी लॉ अपिलेट ट्रिब्युनलच्या आदेशालाही स्थगिती दिली आहे.  नॅशनल कंपनी लॉ अपिलेट ट्रिब्युनलने बायजू विरुद्ध दिवाळखोरीची कारवाई रद्द केली होती. तसेच सर्वोच्च न्यायालयाने  एनसीएलएटीच्या निर्णयाविरोधात अमेरिकन सावकार ग्लास ट्रस्ट कंपनीच्या याचिकेवर बायजूला नोटीस बजावली आहे.

याच बरोबर सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड, न्यायमूर्ती जेबी पार्डीवाला आणि न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांच्या खंडपीठाने  बीसीसीआयला बायजूकडून मिळालेले 158.9 कोटी रुपये वेगळ्या खात्यात ठेवण्याचे निर्देश देखील दिले आहे. माहितीनुसार, 2 ऑगस्ट रोजी दिवाळखोरी अपीलीय न्यायाधिकरणाने बायजूला BCCI सोबत 158.9 कोटी रुपयांच्या थकबाकीच्या सेटलमेंटला मान्यता दिली होती. तसेच बायजूच्या विरुद्ध दिवाळखोरीची कार्यवाही रद्द केली होती. ज्यामुळे बायजू रवींद्रन पुन्हा एकदा कंपनीवर नियंत्रण प्रस्थापित करण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती.

कॅव्हेट दाखल केले  

तर काही दिवसापूर्वी सर्वोच्च न्यायालयात बायजू रवींद्रन यांनी दिवाळखोरी अपीलीय न्यायाधिकरण ‘एनसीएलएटी’ ने दिलेल्या आदेशाच्या निषेधार्थ ग्लास ट्रस्ट कंपनी एलएलसी विरुद्ध कॅव्हेट दाखल केले होते. न्यायालयात हे कॅव्हेट 3 ऑगस्ट रोजी दाखल करण्यात आले होते. अमेरिकन कर्जदारांनी दाखल केलेल्या याचिकेवर न्यायालयाने कोणताही आदेश देण्यापूर्वी त्यांची बाजूही ऐकून घ्यावी अशी विनंती या कॅव्हेटमध्ये करण्यात आली होती.

मोठी बातमी! अभिनेते शिवाजी साटम, अभिनेत्री आशा पारेख यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर

अमेरिकन कोर्टाने हा निर्णय दिला होता

तर दुसरीकडे यापूर्वी बीसीसीआय सोबतच्या करारावर तात्पुरती स्थगिती देण्याचा GLAS ट्रस्ट कंपनीचा अर्ज अमेरिकन कोर्टाने फेटाळला असल्याची माहिती बायजूने दिली होती. माहितीनुसार, GLAS ने NCLAT समोर BCCI सोबतच्या कराराला विरोध केला होता.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube