ऑलिम्पिक खेळाडूंसाठी BCCI ने उघडला खजिना, 8.5 कोटींची मदत देण्याची जय शाहांची घोषणा

ऑलिम्पिक खेळाडूंसाठी BCCI ने उघडला खजिना, 8.5 कोटींची मदत देण्याची जय शाहांची घोषणा

8.5 crore aid from BCCI to IOA : पॅरिस ऑलिम्पि 2024 (Paris Olympics 2024) स्पर्धेचं काउंटडाऊन सुरू झालं आहे. पॅरिस ऑलिम्पिकला 26 जुलैपासून सुरूवात होत आहे. पॅरिसमध्ये ऑलिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूही मोठ्या प्रमाणात सहभागी होणार आहे. यासाठी आता भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने मदतीचा हात पुढे केला आहे. बीसीसीआयकडून भारतीय ऑलिम्पिक संघटनेला (IOA)8.5 कोटी रुपयांचा निधी देण्यात येणार असल्याची घोषणा बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी केली.

विशाळगडावरील हिंसाचाराला जबाबदार कोण ? संभाजीराजेंचे सविस्तर भूमिका मांडणारे पत्रच 

 

26 जुलैपासून सुरू होणारी पॅरिस ऑलिम्पिक 11 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. फ्रान्सची राजधानी पॅरिस येथे होणाऱ्या या खेळांमध्ये 206 देशांतील 10500 खेळाडू सहभागी होणार आहेत. तर भारताकडून 117 खेळाडू सहभागी होतील. त्यामुळं बीसीसीआयने भारतीय ऑलिम्पिक संघटनेला (IOA) कोट्यवधी रुपयांची मदत देण्याची घोषणा केली. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी रविवारी ट्वीट करत लिहिले, ‘मला जाहीर करताना अभिमान वाटतो की पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या खेळाडूंना बीसीसीआयकडून पाठिंबा दिला जाईल. आम्ही या मोहिमेसाठी IOA ला 8.5 कोटी रुपये देत आहोत. आपल्या संपूर्ण भारतीय संघाला खूप शुभेच्छा. देशाचं नाव उज्वल करा, अशी पोस्ट जय शाह यांनी केली.

भाजपसाठी उद्धव ठाकरेंचं सर्वात मोठं आव्हान, त्यांचं नाव घेतल्याशिवाय…; अमित शाहांच्या टीकेला अधारेंचं प्रत्युत्तर 

टोकियो ऑलिम्पिकमध्ये 7 पदके जिंकली
यापूर्वी २०२० मध्ये झालेल्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताने आतापर्यंत सर्वाधिक ७ पदके जिंकली होती. नीरज चोप्राने भालाफेकमध्ये सुवर्णपदक जिंकले होते. याशिवाय मीराबाई चानूने ४९ किलो वेटलिफ्टिंगमध्ये रौप्य, महिलांच्या वेल्टरवेट बॉक्सिंगमध्ये लवलीना बोरगोहेने कांस्यपदक तर महिला एकेरी बॅडमिंटनमध्ये पीव्ही सिंधूने कांस्यपदक जिंकले होते.

 

दरम्यान, टीम इंडियाने टोकियो ऑलिम्पिकमध्ये चमकदार कामगिरी केली होती. त्यामुळे यंदाही भारतीय क्रीडाप्रेमींना खेळाडूंकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube