आता ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटची एन्ट्री; 2028च्या ऑलिम्पिकसाठी ‘या’ नवीन खेळांना मान्यता

आता ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटची एन्ट्री; 2028च्या ऑलिम्पिकसाठी ‘या’ नवीन खेळांना मान्यता

Cricket Return In Olympics: लॉस एंजेलिस ऑलिम्पिक 2028 मध्येही क्रिकेट (cricket) खेळले जाणार आहे. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक (olympic) समितीचे (International Olympic Committee) अध्यक्ष थॉमस बाक यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी मुंबईमध्ये झालेल्या बैठकीत यासंदर्भात मोठा निर्णय घेण्यात आला आहे. यापूर्वी १९०० च्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये क्रिकेट खेळले गेले होते. (Los Angeles) म्हणजेच तब्बल 128 वर्षांनंतर ऑलिम्पिकमध्ये क्रिकेट हा खेळ परतणार आहे.

क्रिकेटसह पाच खेळांचा समावेश करण्याच्या निर्णयाला आयओसी कार्यकारी मंडळाच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. क्रिकेट व्यतिरिक्त, यामध्ये बेसबॉल, सॉफ्टबॉल, फ्लॅग फुटबॉल, स्क्वॅश आणि लॅक्रोस यांचा खेळांचा समावेश असणार आहे.

या महिन्यामध्ये 13 ऑक्टोबर रोजी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने (IOC) लॉस एंजेलिस ऑलिम्पिक 2028 मध्ये क्रिकेटचा समावेश करण्याचा प्रस्तावाला मान्यता दिली आहे.

पाच वेळा चॅम्पियन बनलेला संघ पहिल्यांदाच गुणतालिकेच्या तळाशी; ऑस्ट्रेलियाचं नेमकं काय चुकतंय ?

याअगोदर पॅरिस ऑलिम्पिक (वर्ष १९००) मध्येही क्रिकेट हा खेळ खेळले गेले आहे. त्यानंतर ग्रेट ब्रिटन आणि फ्रान्सने सुवर्णपदकासाठी फक्त एक कसोटी सामना खेळवला गेला होता. यामध्ये ग्रेट ब्रिटन संघाने 158 धावांनी विजय मिळवला होता.

1998 आणि 2022 मध्ये दोनदा कॉमनवेल्थ गेम्समध्ये देखील क्रिकेटचा समावेश करण्यात आला आहे. 2010 आणि 2014 व 2023 मध्ये असे तीनवेळेस आशियाई क्रीडा स्पर्धेत क्रिकेटला प्रथम स्थान मिळाला आहे. लॉस एंजेलिस ऑलिम्पिक 2028 साठी फ्लॅग फुटबॉलला देखील प्रवेश देण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ध्वज फुटबॉलमध्ये दोन्ही संघांमध्ये प्रत्येकी ५ खेळाडू आहेत आणि त्याला फुटबॉलचे अमेरिकन प्रकार असल्याचे संबोधले जाते.

आयओसीच्या सदस्या नीता अंबानी यांनी समितीच्या या निर्णयाचा स्वागत केले आहे. भारतासाठी हा महत्वाचा निर्णय आहे. क्रिकेटच्या समावेशाचा निर्णय घेतल्याबद्दल आयओसीचे मनापासून आभार मानले आहेत. यामुळे ऑलिम्पिक मोहिम आणखी भक्कम होणार असल्याचे नीता अंबानी यांनी यावेळी सांगितले आहे. ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटच्या टी20 फॉरमॅटचा समावेश करण्याविषयी आयओसीने अधिकृत निर्णय घेतला आहे. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने एलए गेम्ससाठी रोस्टरमध्ये पुरुष आणि महिलांच्या सामन्यांसाठी इतर चार खेळांच्या समावेशासाठी मतदान घेतले आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube