गौतम गंभीरचं प्रशिक्षकपद राहणार औटघटकेचं; वर्ल्डकप हिरो खेळाडूचं मोठं भाकित
Gautam Gambhir : गौतम गंभीरने टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदाचा कार्यभार हाती (Gautam Gambhir) घेतला आहे. गंभीरच्या कार्यकाळात सुरुवातीलाच भारतीय संघाला (Team India) मोठं यश मिळालं. श्रीलंके विरूद्धच्या टी 20 मालिकेत विजय (IND vs SL) मिळाला. आता एकदिवसीय मालिका सुरू आहे. राहुल द्रविडने (Rahul Dravid) टी 20 विश्वचषकानंतर मुख्य प्रशिक्षक पद (T20 World Cup 2024) सोडलं होतं. यानंतर गौतम गंभीरची या पदावर नियुक्ती करण्यात आली. याआधी गंभीरने आयपीएलमधील कोलकाता संघाचे मेंटॉर पद सांभाळले आहे. त्याच्या कार्यकाळात कोलकाता संघाने 2024 मध्ये आयपीएल विजेतेपद पटकावलं.
आता याच गौतम गंभीरबाबत टीम इंडियाच्या माजी खेळाडून मोठं भाकित केलं आहे. गौतम गंभीर दीर्घ काळ प्रशिक्षक पदावर राहणे शक्य नाही, असे वक्तव्य भारतीय संघाचा माजी खेळाडू जोगिंदर शर्मा (Joginder Sharma) म्हणाला. सन 2007 मध्ये भारतीय संघाने आयसीसीचा पहिलाच टी 20 विश्वचषक जिंकला होता. या संघात जोगिंदर शर्मा होता.
Gautam Gambhir : दिग्गज असो की सिनियर, कुणालाच सोडलं नाही; क्रिकेट ‘हिस्ट्री’मधील गंभीरचे 5 मोठे वाद
भारतीय संघातील खेळाडूंचे गंभीरशी वाद होऊ शकतात. गौतम गंभीर संघाला सांभाळू शकतो पण मला असं वाटतं की गंभीर फार काळ संघाच्या प्रशिक्षकपदी टिकू शकणार नाही. यामागे काही कारणं आहेत. यातील महत्वाचं कारण म्हणजे गंभीर काही निर्णय स्वतःच घेतो. यामुळे कदाचित एखाद्या खेळाडूशी त्याचा वाद होऊ शकतो. गौतम गंभीरचे काही निर्णय असे असतात जे बऱ्याचदा दुसऱ्यांना पसंत नसतात.
गौतम गंभीर जे काही आहे ते अगदी स्पष्ट सांगून टाकतो. कुणाची मनधरणी करण्याची अपेक्षा त्याच्याकडून करणं अवघडच आहे. कुणाची खुशमस्करी करण्यातलाही गंभीर नाही. तो त्याचं काम अतिशय प्रामाणिकपणे करतो असे जोगिंदर शर्मा म्हणाला.
आणखी तीन वर्षे गंभीरची जबाबदारी
टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदाची जबाबदारी गंभीरला 2027 पर्यंत मिळाली आहे. या काळात भारतीय संघ आयसीसीच्या चार टू्र्नामेंट खेळणार आहे. यामध्ये 2027 चा विश्वचषकही आहे. सध्याच्या काळात भारतीय संघात मोठे बदल होत आहेत. रोहित शर्मा आणि विराट कोहली आणि रवींद्र जडेजा या तिघांनीही टी 20 क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. त्यामुळे एकदिवसीय संघासाठी लवकरच एक पूर्णवेळ कर्णधार शोधावा लागणार आहे. यामुळेच गौतम गंभीरला मोठी जबाबदारी पार पाडावी लागणार आहे.
Gautam Gambhir: विराटच नव्हे, तर कॅप्टन कूल धोनीलाही डिवचले, भारतीय संघातील खेळाडूचा गौप्यस्फोट