Gautam Gambhir : दिग्गज असो की सिनियर, कुणालाच सोडलं नाही; क्रिकेट ‘हिस्ट्री’मधील गंभीरचे 5 मोठे वाद
Gautam Gambhir controversy in Cricket : भारतीय क्रिकेटमध्ये माजी खेळाडू गौतम गंभीर (Gautam Gambhir) याचे मोठे नाव आहे. क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर गंभीरने राजकारणात नवी इनिंग सुरू केली. सध्या तो भाजप खासदार आहे. राजकारणात असला तरी तो अजूनही क्रिकेटशी जोडलेला आहे. वादांशीही गंभीरच नातं जुनच आहे. कधी स्वतःच्या संघातील सहकारी तर कधी विरोधी संघातील खेळाडू तर कधी चक्क सामना पहायला येणारे प्रेक्षक. या सगळ्यांशीच गंभीरने हुज्जत घातली आहे. क्रिकेटच्या मैदानात त्याचे काही वाद चांगलेच गाजले. हे वाद कोणते होते याची माहिती घेऊ.
गंभीर आफ्रिदी वाद
भारत आणि पाकिस्तान यांच्यात 2007 मध्ये क्रिकेट मालिका आयोजित करण्यात आली होती. या मालिकेतील तिसरा वनडे सामना कानपूर येथे खेळवला जात होता. या सामन्यात गंभीर फलंदाजी करत होता आणि आफ्रिदी गोलंदाजी करत होता. अफ्रिदीच्या एका चेंडूवर गंभीरने जोरदार चौकार लगावला. यानंतर चिडलेला आफ्रिदी आणि गंभीर यांच्यात वाद झाले. नंतर रन घेण्यासाठी पळताना पुन्हा दोघात टक्कर झाली पुन्हा भांडण सुरू झालं. शेवटी पंचाना मध्यस्थी करावी लागली.
ईशान किशनचे लाड बीसीसीआय खपवून घेणार नाही, कठोर कारवाईचा इशारा
गंभीर कामरान अकमल वाद
सन 2010 मध्ये आशिया कप श्रीलंकेत आयोजित करण्यात आला होता. यावेळी पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात गौतम चांगलाच भडकला होता. गंभीर बाद असल्याची अपील पाकिस्तानी खेळाडू करत होते. त्यावेळी गंभीर आणि अकमल यांच्यात वाद सुरू झाला. पण नंतर हा वाद इतका वाढला की सामना काही वेळ थांबवावा लागला. याच सामन्यात शोएब अख्तर आणि हरभजन सिंह यांच्यात सुद्धा वाद झाले.
गंभीर आणि कोहली यांच्यातील शत्रुत्व
गौतम गंभीर आणि टीम इंडियाचा धडाकेबाज फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) यांच्यातही कायम वाद होत राहिले. टी 20 लीग क्रिकेटमध्ये दोघात दोन वेळा वाद झाले. पहिल्यांदा सन 2013 मध्ये कोलकाता संघाचा कर्णधार असताना दोघात वाद झाला होता. त्यानंतर 2023 मध्ये गंभीर लखनऊ संघाचा कर्णधार असताना दोघांत वाद पाहण्यास मिळाले.
Team India : टीम इंडियाच्या ‘या’ खेळाडूची तडकाफडकी निवृत्ती; 3 सामन्यानंतर करिअरला ब्रेक!
गंभीर श्रीसंत वाद
सन 2023 मधील लिजेंड क्रिकेट लीगमधील एका सामन्यात गंभीर आणि श्रीसंत यांच्यात जोरदार वाद झाला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना गंभीरने श्रीसंतची चांगलीच धुलाई केली. त्यामुळे श्रीसंत चिडला आणि गंभीरला काहीतरी बोलू लागला. त्यानंतर गंभीरने प्रत्युत्तर दिले. पुढे हा वाद जास्त वाढला नाही.
गंभीर आणि प्रेक्षकांचे भांडण
सन 2023 मधील आशिया कप स्पर्धेदरम्यान गौतम गंभीर आणि सामना पाहण्यासाठी आलेल्या पेक्षकांत वाद झाला. गंभीर सामन्याच्या ब्रॉडकास्टिंगसाठी श्रीलंकेला गेला होता. पावसामुळे सामना थांबला होता. अशा वेळी धोनी आणि कोहलीचे नाव घेत आरडाओरडा सुरू झाल्यानंतर प्रेक्षक आणि गंभीर यांच्यात वाद झाले. नंतर गंभीरने सांगितले की ते लोक देशविरोधी घोषणा देत होते.