गंभीर आणि श्रीशांत लाईव्ह सामन्यात भिडले; दोघांच्या बाचाबाचीत नेमकं काय घडलं?
Sreesanth vs Gautam Gambhir : लेजेंड्स लीग क्रिकेटच्या (legends league cricket) एलिमिनेटर सामन्यात गौतम गंभीर (Gautam Gambhir) आणि एस श्रीशांत S (Sreesanth) यांच्यातील बाचाबाचीचे आता वादात रूपांतर झाले आहे. सुरतमध्ये इंडिया कॅपिटल्स (India Capitals) आणि गुजरात जायंट्स (Gujarat Giants) यांच्यात सामना सुरु होता. यादरम्यान दोन्ही खेळाडू एकमेकांशी भिडले. सामना संपल्यानंतर गुजरात जायंट्सचा गोलंदाज श्रीशांतने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात इंडिया कॅपिटल्सचा कर्णधार गौतम गंभीरवर टीका करत मोठे खुलासे केले आहेत.
श्रीशांतने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये म्हटले की गौतम गंभीर त्याला सतत ‘फिक्सर’ म्हणत होता. 2013 मध्ये आयपीएल स्पॉट फिक्सिंगच्या आरोपाखाली श्रीशांतवर बीसीसीआयने आजीवन बंदी घातली होती. मात्र, नंतर त्याची बंदी सात वर्षांवर आणण्यात आली होती. श्रीशांत सध्या लिजेंड्स लीग क्रिकेटमध्ये खेळत आहे.
लेजेंड्स लीग क्रिकेटच्या एलिमिनेटर सामन्यात दुसरे षटक टाकायला आलेल्या श्रीशांतच्या पहिल्या चेंडूवर गौतम गंभीरने षटकार खेचला आणि पुढच्या चेंडूवर चौकार मारला. मात्र यानंतर गौतम गंभीर आणि श्रीशांतमध्ये बाचाबाची झाली. बॉलिंग मार्कवर परतताना श्रीशांतने गंभीरकडे खुन्नस देत पाहिलं होतं. पॉवरप्लेनंतर दोघांमध्ये जोरदार वादावादी झाली. श्रीसंतने या प्रकरणी एक व्हिडिओ शेअर करत मोठे खुलासे केले आहेत. या व्हिडिओमध्ये गंभीरवर आरोप करताना श्रीशांत म्हणाला की, गंभीर त्याला सातत्याने फिक्सर म्हणत होता.
Sonakshi Sinha : दबंग गर्ल सोनाक्षी सिन्हाच्या सोज्वळ लूकवर चाहते फिदा
श्रीशांतने एका इंस्टाग्राम पोस्टमध्ये म्हटले आहे की, “मी त्याच्यासाठी एकही वाईट शब्द वापरला नाही किंवा एकही अपमानास्पद शब्द वापरला नाही. मी फक्त म्हणालो, “तू काय म्हणत आहेस? तू काय म्हणतोस?” खरं तर, तो मला “फिक्सर, फिक्सर, तू फिक्सर आहेस, फिक्सर आहेस” म्हणत उपहासाने हसत राहिला. हीच भाषा वापरली गेली होती, असे त्याने म्हटले आहे.
Shilpa Shetty चा पती राज कुंद्राला मोठा दिलासा; पोर्नोग्राफीमध्ये ईडीला आढळला नाही थेट संबंध
दरम्यान, इंडिया कॅपिटल्सने या सामन्यात गुजरात जायंट्सचा 12 धावांनी पराभव केला. इंडिया कॅपिटल्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. इंडिया कॅपिटल्सकडून कर्णधार गौतम गंभीरने 51 धावांची खेळी केली. गंभीरने अवघ्या 30 चेंडूत 51 धावा केल्या आणि इंडिया कॅपिटल्सने 20 षटकांत 7 गडी गमावून 223 धावा केल्या. प्रत्युत्तरात ख्रिस गेलने गुजरात जायंट्सकडून 84 धावांची झटपट खेळी केली.मात्र, तो संघाला विजयापर्यंत नेऊ शकला नाही. गुजरातचा या सामन्यात 12 धावांनी पराभव झाला. गुजरात जायंट्सला निर्धारित 20 षटकात 7 गडी गमावून 211 धावा करता आल्या.