Duleep Trophy 2024: बीसीसीआयचा दट्टा; टॉप खेळाडू दुलीप ट्रॉफीमध्ये खेळणार, यंदा चार संघ कसे असणार

  • Written By: Published:
Duleep Trophy 2024: बीसीसीआयचा दट्टा; टॉप खेळाडू दुलीप ट्रॉफीमध्ये खेळणार, यंदा चार संघ कसे असणार

Rohit Sharma Virat Kohli might take part Duleep Trophy 2024 : श्रीलंकेच्या (Sri Lanka) दौऱ्यावर गेलेल्या भारतीय संघाला एकदिवसीय सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यानंतर भारतीय संघ बांग्लादेशबरोबर कसोटी आणि एकदिवसीय मालिका खेळणार आहे. पण सध्या बांगलादेशची राजकीय परिस्थिती पाहता ही मालिका निश्चित नाही. त्यामुळे येत्या चाळीस दिवस तरी भारतीय संघ सामने खेळणार नाही. त्यामुळे भारतीय संघातील अनेक दिग्गज खेळाडू हे दुलीप (Duleep Trophy 2024) ट्रॉफीमध्ये खेळणार आहे. एकदिवसीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma), विराट कोहली हे या ट्रॉफीमध्ये खेळू शकतात. हे सामने बेंगळुरूतील एम. चिन्नास्वामी मैदानावर खेळविले जाऊ शकतात.

HSC SSC Exam Dates : दहावी बारावीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर; बोर्डाने केला मोठा बदल

तर अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या आणि जसप्रीत बुमराह यांच्या खेळण्याबाबत अद्याप निश्चितता नाही. या ट्रॉफीचे सामने आंध्रप्रदेशमधील अनंतपूर येथे होणार होते. परंतु यामध्ये बदल करण्यात आल्याचे माहिती क्रिकबजने दिली आहे. हे सामने चिन्नास्वामी स्टेडियमवर होतील, असा निर्णय भारतीय क्रिकेट मंडळाने (BCCI) ने घेतला असल्याचे क्रिकबजने म्हटले आहे. ही स्पर्धा 5 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली हे 12 सप्टेंबरपासून दुसऱ्या राउंडमध्ये खेळू शकतात. तर रोहित शर्मा, विराट कोहली आणि जसप्रीत बुमराह हे खेळाडू वगळता उर्वरित सर्व खेळाडूंनी या स्पर्धेत खेळण्यास सांगितले आहे. रोहित शर्मा, विराट कोहली आणि बुमराह खेळा किंवा नका खेळाडू असा पर्याय देण्यात आलाय. भारतीय संघाची सर्वच खेळाडूंनी या ट्रॉफीमध्ये खेळले पाहिजे, असे बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी म्हटले होते.

Team India : हार्दिक पांड्याला पुन्हा धक्का, ‘हा’ स्टार खेळाडू होणार भारतीय संघाचा कर्णधार


हे खेळाडू खेळणार

के. एल राहुल, शुभमन गिल, आर अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, श्रेयस अय्यर, इशान किशन आणि यशस्वी जैस्वाल हे खेळाडू दुलीप ट्रॉफीत खेळताना दिसणार आहे. तर हार्दिक पांड्या हा कसोटी क्रिकेटमध्ये खेळत नाही. त्यामुळे तो या स्पर्धेत नसेल. तर वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीही या स्पर्धेत खेळणार नाही. तो जायबंदी आहे.

नव्या फॉर्मेटमध्ये स्पर्धा खेळणार
दुलीप ट्रॉफी यंदा नव्या फॉर्मेटमध्ये खेळविले जाणार आहे. ही स्पर्धा विभागीय संघ करू खेळविली जात असते. आता निवड समितीचे प्रमुख अजित आगरकर यांनी चार संघ तयार करण्यात येतील. इंडिया ए, इंडिया बी, इंडिया सी आणि इंडिया डी असे चार संघ स्पर्धेत भाग घेतली.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube