भारतीय संघावर ‘गंभीर’ राज! बीसीसीआयची घोषणा, मिळाली मोठी जबाबदारी

भारतीय संघावर ‘गंभीर’ राज! बीसीसीआयची घोषणा, मिळाली मोठी जबाबदारी

Gautam Gambhir : भारताचा माजी फलंदाज गौतम गंभीरची (Gautam Gambhir) टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.याबाबत बीसीसीआय सचिव जय शाह यांनी माहिती दिली आहे.

गंभीर भारतीय संघाचा माजी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडची जागा घेणार आहे. राहुल द्रविडचा कार्यकाळ T20 विश्वचषक 2024 नंतर संपला आहे. माहितीनुसार, गौतम गंभीर श्रीलंका दौऱ्यापासून पदभार स्वीकारणार आहे.

जय शाह यांनी याबाबत ट्विट केला आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, मला अत्यंत आनंद होत आहे की गौतम गंभीर यांची टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती झाली आहे. आधुनिक क्रिकेट वेगानं विकसित होत आहे आणि या बदलाचा गौतम गंभीर साक्षीदार आहे.

आपल्या कारकिर्दीत गंभीरने अनेक जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत तसेच त्यांनी विविध पदांवर काम केलं आहे. भारतीय संघाच्या प्रशिक्षक पदासाठी गंभीर योग्य व्यक्ती आहे. गंभीर भारतीय क्रिकेटला पुढे नेईल, असं जय शाह यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

Order of St. Andrew the Apostle पंतप्रधान मोदींना दुसऱ्यांदा मिळाला रशियाचा सर्वोच्च नागरी सन्मान

केकेआरसाठी आयपीएल 2024 मध्ये गंभीरने मेंटॉरची भूमिका पार पडली होती. त्यापूर्वी तो लखनौ सुपर जायंट्सचा मेंटॉर होता. भारतीय संघासाठी गंभीरने 58 कसोटी सामने खेळले आहे. त्यामध्ये त्याने 4154 धावा केल्या आहे. यात 9 शतक आणि 22 अर्धशतक आहे. तर 2012 आणि 2014 मध्ये केकेआरला गौतम गंभीरने आयपीएलचं विजेतेपद मिळवून दिले आहे आणि 2024 मध्ये केकेआरने त्यांच्या मार्गदर्शनाखाली विजेतेपद पटकावले आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज