पत्रकाराची गुगली अन् राहुल द्रविड संतापलाच; 1997 च्या ‘त्या’ सामन्यात काय घडलं होतं?

पत्रकाराची गुगली अन् राहुल द्रविड संतापलाच; 1997 च्या ‘त्या’ सामन्यात काय घडलं होतं?

T20 World Cup 2024 Rahul Dravid : टी 20 विश्वचषकातील सुपर 8 फेरीतील तिसरा सामना (T20 World Cup 2024) आज भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात होणार (IND vs AFG) आहे. याआधी आयोजित करण्यात आलेल्या एका पत्रकार परिषदेत टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) चांगलेच संतापल्याचे दिसून आले. याचं कारण म्हणजे पत्रकारांनी त्यांना असा काही टोचणारा प्रश्न विचारला तो द्रविडला चांगलाच झोंबला.

भारतीय संघातील यशस्वी खेळाडू म्हणून राहुल द्रविडकडं पाहिलं जातं. द्रविडने त्याच्या कार्यकाळात अनेक दमदार खेळी करुन संघाला विजय मिळवून दिला. मात्र, बार्बाडोसच्या मैदानाच्याबाबतीत त्याच्या काही न विसरता येणाऱ्या आठवणीही आहेत. पत्रकारांनी नेमका याच बाबतीत प्रश्न विचारला. त्यामुळे द्रविड काहीसा संतापल्याचे दिसले. पत्रकाराला उत्तर देत मी आता इतिहासातील कटू आठवणी विसरलो असून सध्या फक्त कोच म्हणून चांगल्या प्रदर्शनावर लक्ष केंद्रीत केलं आहे.

ठरलं! गौतम गंभीर होणार टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक, ‘या’ दिवशी होणार घोषणा

नेमकं काय घडलं?

एक खेळाडू म्हणून तुम्ही या मैदानावर खेळला आहात. 1997 मधील कसोटी सामन्यात तुमच्या चांगल्या आठवणी नसतील असे विचारले असता द्रविड म्हणाला येथे माझ्या काही चांगल्या आठवणी देखील आहेत. त्यावर पत्रकार पुन्हा म्हणाला माझा प्रश्नही तोच आहे की आता आणखी चांगलं प्रदर्शन करुन या आठवणी आणखी चांगल्या करण्याची संधी तुमच्याकडे आहे का, असे म्हणाला.

या प्रश्नावर द्रविड थोडासा वैतागला आणि म्हणाला मी काही येथे नव्या आठवणी तयार करण्याचा प्रयत्न करत नाही. मी काही गोष्टी लवकर विसरुन जातो. मागं वळून पाहण्याची माझी सवय नाही. जे आता करतोय त्यावरच लक्ष केंद्रीत करण्याची माझी सवय आहे. 1997 मध्ये नेमकं काय घडलं होतं याचा मला त्रास होत नाही.

मोठी बातमी : माझा शेवटचा T20 विश्वचषक; संघाच्या खराब कामगिरीनंतर ट्रेंट बोल्टचा ‘रामराम’

बार्बाडोस कसोटीत काय घडलं होतं?

सन 1997 मध्ये बार्बाडोस येथे खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यात प्रतिस्पर्धी संघाकडून भारताला 121 धावांचे आव्हान मिळाले होते. परंतु टीम इंडियाला हे माफक आव्हानही साधता आले नाही. अख्खा संघ 81 धावाच करू शकला आणि 39 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. वेस्टइंडिज विरूद्धच्या या सामन्यात पहिल्या डावात राहुल द्रविडने 78 रन केले होते. सचिन तेंडुलकरनेही 92 धावा करून भारताला आघाडी मिळवून दिली होती. पुढील इनिंगमध्ये मात्र फलंदाज सपशेल अपयशी ठरले होते.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज