Sachin Tendulkar : सचिनचे 5 महारेकॉर्ड अजूनही अभेद्य; फक्त ‘या’ दोन खेळाडूंनी दिलीय टक्कर

Sachin Tendulkar : सचिनचे 5 महारेकॉर्ड अजूनही अभेद्य; फक्त ‘या’ दोन खेळाडूंनी दिलीय टक्कर

Sachin Tendulkar Birthday : टीम इंडियाचा माजी खेळाडू मास्टरब्लास्टर अर्थात सचिन तेंडुलकर. सचिनचा (Sachin Tendulkar Birthday) आज वाढदिवस आहे. सचिन आज त्याचा 51 वा वाढदिवस साजरा करत आहे. टीम इंडियाच्या या दिग्गज फलंदाजाने त्याच्या कारकिर्दीत अनेक विक्रमांना गवसणी घातली. त्याच्या नावावर असे काही विक्रम आहेत की तुटणे सहसा शक्य वाटत नाही. भारतीय संघात असताना त्याच्या नावाची वेगळीच क्रेझ होती. आज आपण सचिनच्या अशाच पाच विक्रमांची माहिती घेणार आहोत जे तुटणे सहसा शक्य नाही.

सचिन तेंडुलकर हा सर्वाधिक कसोटी सामने खेळणारा खेळाडू आहे. त्याने त्याच्या कारकिर्दीत 200 सामने खेळले आहेत. इंग्लंड संघाचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन मात्र सचिनच्या या विक्रमाच्या जवळ पोहोचला आहे. जेम्स अँडरसनच्या नावावर 187 कसोटी सामने आहेत. आता तो सचिनचे रेकॉर्ड मोडणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

T20 World Cup : राहुल, संजू, ऋषभ अन् कार्तिक; कुणाला मिळणार संधी? लवकरच घोषणा

सचिनने त्याच्या कारकिर्दीत 34 हजार 357 धावा केल्या आहेत. क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक धावा करणारा खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिले जाते. सचिनचा हा विक्रम मोडणे सहज शक्य नाही. सध्याच्या घडीला विराट कोहली हाच (Virat Kohli) एक फलंदाज आहे ज्याने 25 हजार धावांचा टप्पा पार केला आहे. विराट कोहलीच्या खेळात सातत्य आहे. धावा करण्याचा त्याचा वेगही जास्त आहे. त्यामुळे पुढील काही वर्षात विराट कोहली सचिनचे रेकॉर्ड मोडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

सचिन आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत सर्वाधिक सामने खेळणारा खेळाडू ठरला आहे. सचिनने आतापर्यंत 664 सामने खेळले आहेत. सध्या 500 आंतरराष्ट्रीय सामन्यांचा टप्पा विराटने पार केला आहे. आता विराट सचिनचे हे रेकॉर्ड मोडणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

‘रोहित शर्मा अन् आगरकर ठरवतील तसं..T20 वर्ल्डकपसाठी कार्तिकचा क्लिअर मेसेज

सचिन तेंडुलकरने क्रिकेटच्या मैदानात सर्वाधिक चौकार मारले आहेत. सचिनने 664 सामन्यांतील 782 डावांमध्ये फलंदाजी करताना 4076 पेक्षा जास्त चौकार लगावले आहेत. या यादीत श्रीलंकेचा माजी खेळाडू कुमार संगकारा याचं नाव आहे. संगकाराने त्याच्या कारकिर्दीत एकूण 3015 चौकार मारले आहेत. सचिनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक 50 किंवा त्यापेक्षा जास्त रन्स केले आहेत. सचिनने 264 वेळा 50 धावांचा टप्पा पार केला आहे. यामध्य 100 शतके आणि 164 अर्धशतकांचा समावेश आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • twitter
  • youtube