Virat Kohli : सामना जिंकताच विराटचा थेट अनुष्काला व्हिडीओ कॉल; मुलांना दिले फ्लाइंग किस

Virat Kohli : सामना जिंकताच विराटचा थेट अनुष्काला व्हिडीओ कॉल; मुलांना दिले फ्लाइंग किस

Virat Kohli Video Calls Anushka Sharma: विराट कोहली (Virat Kohli ) आणि अनुष्का शर्मा (Anushka Sharma) हे बॉलीवूडच्या क्यूट कपल्सपैकी एक आहेत, दोघेही सोशल मीडियावर (Social Media) खूप सक्रिय असतात आणि एकमेकांबद्दलचे प्रेम व्यक्त करत असतात. सध्या विराट कोहली आपली जादू दाखवत आहे. 25 मार्च रोजी सामना होता, जो विराटच्या संघाने जिंकला. सामना जिंकल्यानंतर विराट कोहली पत्नी अनुष्का शर्मा आणि मुलांशी व्हिडिओ कॉलवर बोलत असतानाचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार धुमाकूळ घालत आहे, यादरम्यान विराटच्या चेहऱ्यावरील हावभाव खूपच गोंडस होते. त्यामुळे सर्वत्र त्याच्या व्हिडिओची जोरदार चर्चा रंगत आहे.

विराटचा संघ रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा पंजाब किंग्जसोबत सामना होता, जो विराटच्या संघाने जिंकला. या सामन्यानंतर विराटने पत्नी अनुष्का शर्माला व्हिडिओ कॉल केला. यादरम्यान विराटने त्याच्या लिटिल चॅम्पियनशीही बोलले, त्याची मुलगी वामिका आणि नुकताच आलेला छोटा पाहुणा अकाय हे व्हिडिओ कॉलवर होते. विराट जेव्हा या दोघांशी बोलत होता, त्यावेळेस तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरचे हाव- भाव खूपच मजेदार दिसत होते. व्हिडिओ कॉलमध्ये विराट मुलांना हसवण्याचा प्रयत्न करत होता.


विराट खूप आनंदी दिसत होता

सामना जिंकल्यानंतर विराट कोहली कुटुंबीयांशी बोलल्यानंतर खूप आनंदी दिसत आहे. व्हिडिओमध्ये त्याचा आनंद खूप जवळून पाहायला मिळाला आहे. यादरम्यान विराट कोहली आपल्या मुलांना आणि पत्नीला फ्लाइंग किस देताना दिसला. विराटच्या चाहत्यांना हा क्युट व्हिडिओ खूपच आवडला आहे. चाहते या व्हिडिओवर मोठ्या प्रमाणात कमेंट करायला सुरुवात केली.

ठाकरेंचा अहंकार अन् मुंबईला POK म्हणणाऱ्या कंगनाला भाजपनं यासाठी दिली उमेदवारी!

विराटची पत्नी आणि मुलांशी बोलतानाचा व्हिडिओ व्हायरल होण्याची ही पहिलीच वेळ नाही. जेव्हाही अनुष्का विराटची मॅच पाहायला येते तेव्हा विराट तिला पाहून खूपच रोमँटिक हावभाव करताना दिसत असतो. बऱ्याच वेळा तो खायला मागताना दिसला आहे तर कधी अनुष्का तिला तिच्या एक्सप्रेशनने वेल्डन म्हणाल्याचे दिसले आहे.

वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर अनुष्का शर्माने बऱ्याच दिवसांपासून अभिनयातून ब्रेक घेतला आहे. ती अखेरची शाहरुख खानसोबत झिरोमध्ये दिसली होती. आता ती चकडा एक्सप्रेसने परतणार असल्याची माहिती आहे. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • twitter
  • youtube

वेब स्टोरीज