Virat Kohli: लंडनमध्ये बाप-लेकीची लंच डेट; मात्र फोटो शेअर करताना ‘तो’ नियम…

Virat Kohli: लंडनमध्ये बाप-लेकीची लंच डेट; मात्र फोटो शेअर करताना ‘तो’ नियम…

Virat Kohli Daughter Vamika: अनुष्का शर्मा (Anushka Sharma) आणि विराट कोहली (Virat Kohli ) यांनी 15 फेब्रुवारी रोजी त्यांच्या दुस-या मुलाचे स्वागत केले. त्याने त्याच्या इंस्टाग्रामवर (Instagram) याबद्दलची माहिती दिली. त्यात मुलाच्या नावाचाही उल्लेख होता. त्यांच्या छोट्या चॅम्पियनचे नाव अकाय ठेवण्यात आले आहे. आतापर्यंत हे जोडपे लंडनमध्येच वेळ घालवत आहेत. आता विराट कोहली आणि त्याची लाडकी लेक वामिकाचा (Vamika) लंडनमधील एक फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. (social media) यामध्ये वामिका तिच्या वडिलांसोबत जेवण करताना दिसत आहे.

रेडिटवर हा फोटो शेअर करण्यात आला आहे, यामध्ये वामिका आणि विराट कोहली एकत्र पाहायला मिळत आहे. या फोटोवर चाहते खूप प्रेमाचा वर्षाव करत आहेत. एका यूजरने लिहिले आहे की, “मला माहित आहे की आपण तिला फक्त मागून पाहू शकतो पण ती खूप सुंदर दिसते. तिचे केस खूप सुंदर आहेत, विराट कोहली खूप चांगला वडील आणि पती आहे. तर दुसऱ्या एका यूजरने विराट आणि अनुष्का भारतात परत येण्यावर कमेंट केली आहे, “घर आजा परदेसी तेरा देश बुलाये रे….” अशी कॉमेंट्स सध्या होत आहेत.

तर आणखी एका युजरने विराटचे तोंडभरून कौतुक करत लिहिले की, “पप्पा मोठ्या मुलीला बाहेर घेऊन जात आहेत जेणेकरून आई आणि लहान मुलाला चांगला वेळ घालवता येईल. हे खूप गोंडस आहे, मला असे म्हणायचे आहे की फार कमी लोक असे करतात.” फोटोमध्ये, वामिकाने निळा आणि पांढरा चेक स्वेटर घातला आहे आणि तिचे लांब केस देखील पाहायला मिळत आहेत. चाहतेही वामिकाच्या केसांचे खूप कौतुक करत आहेत. व्हायरल झालेला फोटो पाहून लोकांना विश्वास बसत नाही की ती एवढी मोठी झालीय.

Rohit Shetty: ‘खतरों के खिलाडी 14 शो बाबत मोठी अपडेट; शूटिंग होणार ‘या’ सुंदर देशात

अनुष्का शर्मा-विराट कोहली: अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांनी तिच्या जन्मानंतर 5 दिवसांनी त्यांच्या दुस-या मुलाबद्दल सांगितले होते. यासोबतच विराटने अनुष्काच्या प्रेग्नेंसीची बातमीही सर्वांपासून लपवून ठेवली होती. 2017 मध्ये डिसेंबर महिन्यात दोघांचे लग्न झाले. यानंतर 2021 मध्ये अनुष्काने वामिकाला जन्म दिला. आता या जोडप्याने नव्या पाहुण्यांचे जोरदार स्वागत केले आहे. हे जोडपे आता दोन मुलांचे पालक आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • twitter
  • youtube