Rohit Shetty: ‘खतरों के खिलाडी 14 शो बाबत मोठी अपडेट; शूटिंग होणार ‘या’ सुंदर देशात

Rohit Shetty: ‘खतरों के खिलाडी 14 शो बाबत मोठी अपडेट; शूटिंग होणार ‘या’ सुंदर देशात

Khatron Ke Khiladi 14: कलर्स टीव्हीच्या ‘खतरों के खिलाडी’ (Khatron Ke Khiladi) या साहसी रिॲलिटी शोच्या 14 व्या सीझनची (Season 14) जोरदार तयारी सुरू झाली आहे. रोहित शेट्टीच्या (Rohit Shetty) या सेलिब्रिटी स्टंटवर आधारित रिॲलिटी शोमध्ये कोणताही पक्षपातीपणा किंवा अतिरिक्त नाटक नाही. या शोमध्ये सहभागी होणाऱ्या सर्व स्पर्धकांना केवळ त्यांच्या टॅलेंटवर महत्व दिला जातो. आणि प्रेक्षक दरवर्षी ‘खतरों के खिलाडी’च्या नवीन सीझनची मोठ्या आतुरतेने वाट पाहत असते.मात्र रोहित शेट्टीचा हा शो यावर्षी नेमका कुठे शूट होणार आहे आणि या शोसाठी आतापर्यंत कोणत्या कलाकारांना संपर्क करण्यात आला आहे. चला तर मग पाहूया…

‘खतरों के खिलाडीचे बहुतेक सीझन दक्षिण आफ्रिकेत चित्रित झाले असले तरी. पण शो ब्राझील (सीझन 3), अर्जेंटिना (सीझन 7 आणि 9), बल्गेरिया (सीझन 10) आणि स्पेन (सीझन 8) मध्ये शूट करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. प्राण्यांच्या स्टंटबाबत दक्षिण आफ्रिकेत जे स्वातंत्र्य दिले जाते ते इतर कोणत्याही देशांमध्ये मिळत नाही आणि त्यामुळेच निर्माते ‘खतरों के खिलाडी’साठी दक्षिण आफ्रिकेला खूप प्राधान्य देत असल्याचे पाहायला मिळत असतात. पण सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रोहित शेट्टीचा हा रिॲलिटी शो यावर्षी दक्षिण आफ्रिकेत शूट होणार नसल्याची माहिती मिळाली आहे.

चौथ्या दिवसांत बजेट वसूल, यामी गौतमच्या ‘आर्टिकल 370’ सिनेमानं पार केला इतक्या कोटींचा टप्पा

KKK 14 ची शूटिंग जॉर्जियामध्ये होऊ शकते: सध्या रोहित शेट्टी आणि त्याची स्टंट टीम रेसमध्ये व्यस्त आहे. या टीमने सध्या अर्जेंटिना, जॉर्जिया आणि थायलंडचा दौरा केला आहे. पण अर्जेंटिनामध्ये दररोज तीन वेळा बदलणारे हवामान शूटिंगसाठी आव्हानात्मक ठरू शकते आणि थायलंडमध्ये स्टंट करणे कठीण होणार आहे. यामुळे रोहित शेट्टीच्या टीमला यावेळी शोचे शूटिंग जॉर्जियामध्ये करणार असल्याची माहिती समोर आली आहे. जेणेकरून कठीण स्टंट करण्यासाठी त्यांना योग्य सुरक्षा आणि सुविधा मिळू शकणार आहे.

‘या’ स्पर्धकांची हजेरी लागणार: अलीकडेच जिया शंकर आणि आकांक्षा पुरी यांना ‘खतरों के खिलाडी 14’ मध्ये सहभागी होण्यासाठी संपर्क साधण्यात आला आहे. या दोघांशिवाय बिग बॉस 17 मधील अभिषेक कुमार, ईशा मालवीय, मुनावर फारुकी, मन्नारा चोप्रा आणि नील भट्ट. अभिषेक मल्हान आणि मनीषा राणी व्यतिरिक्त, अंकित गुप्ता, शोएब इब्राहिम, प्रियंका चहर चौधरी आणि विवेक दहिया यांना देखील शोमध्ये सामील होण्यासाठी बिग बॉस ओटीटीकडून संपर्क साधण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज