Rohit Shetty: शिल्पा अन् दीपिका रोहित शेट्टीच्या ‘गुड बुक’मध्ये, केलं तोंडभरून कौतुक

Rohit Shetty: शिल्पा अन् दीपिका रोहित शेट्टीच्या ‘गुड बुक’मध्ये, केलं तोंडभरून कौतुक

Deepika Padukone And Shilpa Shetty: चित्रपट निर्माता रोहित शेट्टी (Rohit Shetty) त्याच्या टीमसोबत ‘भारतीय पोलीस दल’च्या प्रमोशनमध्ये व्यस्त असल्याचे पाहायला मिळत आहे. रोहित शेट्टीसोबतच सिद्धार्थ मल्होत्रा, शिल्पा शेट्टी आणि विवेक ओबेरॉय हे त्रिकुटही चाहत्यांचा उत्साह वाढवण्यात व्यस्त आहे. दरम्यान, एका मुलाखतीच्या दरम्यान रोहित शेट्टीला दीपिका पदुकोण (Deepika Padukone) आणि शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) यांच्यातील एक उत्तम पोलीस अभिनेत्री निवडण्यास सांगितले असता, दिग्दर्शकाने त्या दोघीना जय आणि वीरू उपमा दिली आहे.

एका कार्यक्रमादरम्यान रोहितला जेव्हा विचारण्यात आले की तुमच्या मते दीपिका पदुकोण किंवा शिल्पा शेट्टी यापेक्षा चांगला पोलिस कोण बनवू शकतो? तर यावर चित्रपट निर्मात्याने थेटच उत्तर दिल्याचे दिसून आले आहे, शिल्पा अन् दीपिका रोहित शेट्टीच्या ‘गुड बुक’मध्ये शामिल झाले आहेत. या दोघींबद्दल अभिनेत्याने तोंडभरून कौतुक केले आहे.

‘शोले सिनेमातील जय आणि वीरूची उपमा अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि शिल्पा शेट्टी या दोघीना दिग्दर्शकाने यावेळी दिले आहे. शिल्पा शेट्टी रोहित शेट्टीच्या ओटीटी डेब्यू सिरीज इंडियन पोलिस फोर्समध्ये पोलिसाच्या भूमिकेत दिसणार आहे. ही सिरीज 19जानेवारीपासून Amazon प्राइम व्हिडिओवर प्रसारित होणार आहे. या सिरीजमध्ये ईशा तलवार, निकितिन धीर, शरद केळकर आणि श्वेता तिवारी यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.

Merry Christmas: कतरिना कैफने सांगितला विजय सेतुपतीसोबत काम करण्याचा अनुभव, म्हणाली…

‘सिंघम अगेन’ बद्दल बोलायचे तर हा चित्रपट रोहित शेट्टीच्या सिंघम फ्रँचायझीचा तिसरा भाग असणार आहे. यावेळी, अजय देवगण, दीपिका पदुकोण, रणवीर सिंग, करीना कपूर खान, टायगर श्रॉफ यांसारखे स्टार्स कॉप युनिव्हर्सचा एक भाग असणार आहे. या वर्षाच्या अखेरीस हा चित्रपट प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज